पुन्हा रानटी अवस्थेकडे चाललोय का ?

होते गुण सर्व, हिंस्र पशुचे,
असतांना रानटी अवस्थेत,
पण दिले वरदान तुला निसर्गाने,
अडचणींवर मात करण्याचे,
तीक्ष्ण बुद्धीमत्तेचे.!
तुझ्यातील क्रुरता, मत्सर,स्वार्थ, क्रौर्य, लोभ, आकस,
दोषांचे निराकरण करण्यासाठी,
देह झिजवले महापुरुषांनी,
माणसातील,
मानवता जागविण्यासाठी,
वृद्धिंगत करण्यासाठी.!
दिले मार्गदर्शन तुला,
विविध धर्म, पंथाच्या माध्यामातून,
तुझे आचार, विचार अन कृतिशीलता, उतरव्यात प्रत्यक्षात,
मनाच्या तळातून.!
तु नशीब घेऊन, आलास धरतीवर,
मिळाला उपदेश तुला,
चालण्या सन्मार्गाच्या वाटेवर,
विविध धार्मिक, पांधीक,
वचनाच्या माध्यामातून.!
वाटते झालाय, माणूस सुधारलेला,
पुढारलेला,
सर्वांगाने विकसित झालेला,
लावलेत अचंबित शोध,
गवसणी घातलीय, अंतराळाला,
आनंदी होते मन,
हात लागतो गगनाला.!
पण,
सध्याची भयावह स्थिती पाहता,
भीती वाटते,
दूरदर्शनवरील बातम्या पाहतांना,
वर्तमानपत्रात डोकावताना,
लबाडीने केलाय कहर,
राजकारण्यांनी मिसळलं,
भाषेचं जहर.!
घडताहेत घटना नित्यनेमाने,
जोर, जबरदस्ती, बलात्काराच्या,
खून, अपहरण अन खंडणीच्या,
कपट, कारस्थान ,अन कुरघोडीच्या,
चाललीय स्पर्धा, खोट्याला,
खर्यावर मात करण्याच्या.!
विषन्न होते मन, पाहून कृती,
पुढील कैक पिढ्यांच्या उद्धारासाठी,
अचंबित मालमत्ता जमविण्याचा,
राजकारण्यांच्या हाणामारीच्या,
अर्वाच्य भाषा उच्चारण्याच्या,
खुर्च्यांच्या फेकाफेकीच्या
जणु काही,
विसर पडलाय शिकवणीचा,
राजकारणातून समाजकार्य करण्याचा.!
पाहून ही बजबजपुरी,
यादवी, अंदाधुंदी,
घडतंय सर्व स्वार्थापायी,
म्हणुन कधी कधी मनात विचार,
डोकावून जातो,
परिस्थितीनुरूप आपण,
पुन्हा रानटी अवस्थेकडे चाललोय का?
पुन्हा रानटी अवस्थेकडे चाललोय का ?
पुन्हा रानटी अवस्थेकडे,
चाललोय का ?
अरुण निकम,
9323249487.
मुंबई.
दिनांक…25/07/2025.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत