” खेळ, दूरदर्शनवरील जुगाराचा”

🙏🙏 मनोगत 🙏🙏
सुरू आहे संततधार, जाहिरातींची,
भूलभुलैयाने, टीकेना पैसा घरात,
अन सिलेब्रिटीच ,
खेळा म्हणुन सांगतात.!
जुगार, तो जुगारच असतो,
मृगजळाच्या मायाजालात फसवतो,
घास तोंडातील, लेकरांच्या पळवतो,
पण घडतंय विपरीत, सेलेब्रिटीच, प्रोत्साहित करतांना दिसतो.!
सट्टा तो सट्टाच असतो,
पैशांबिगर नसतो, लालसेने भूलवतो,
हातचं सोडून पळत्याच्या,
मागे धावतं करतो,
पण सेलेब्रिटीच खेळण्यास ,
उचकवतांना दिसतो.!
देश घडवणारी पिढी,
ढकलली जाताहे, बरबादीच्या खाई,
धन दांडग्याचेच , उखळ पांढरे होई,
हरण्याच्या दुःखापाई ,
गरीब मात्र गलितगात्र होई.!
मला सेलिब्रिटींना विचारावसं वाटतं,
जाहिराती करून तुम्ही,
करोडपतीचे, अरबोपती झालात,
तुमच्या पैकी किती लोक,
हा बरबादीचा, खेळ खेळतात ?
हा बरबादीचा, खेळ खेळतात ?
हा बरबादीचा, खेळ खेळतात ?
अरुण निकम.
9323249487.
मुंबई.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत