दिन विशेषदेशप.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचेडॉ बाबासाहेब आंबेडकर असलेले निष्ठ…

अण्णाभाऊनी त्यांची “फकिरा” ही “कादंबरी “डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या झुंजार” लेखणीला” अर्पण” केली होती. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरीनिर्वान झाले त्यावेळी आणि त्याच्यानंतर सगळ्या देशामधून, राज्यामधून, जिल्ह्यामधुन, तालुक्यामधुन आणि नगरा-नगरा मधून बाबासाहेबांना श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम होत होता….

अश्याच वेळी आपल्या महाराष्ट्रातील सगळे त्यावेळेचे ख्यातनाम गायक, ख्यातनाम कवी , शाहीर यांनी ठरवले कि आपण हि “बाबासाहेबांना आदरांजली” किंवा श्रद्धांजली, म्हणुन एक कार्यक्रम ठेवायचा आणि प्रत्येकाने “बाबासाहेबांना अभिवादनपद” एक गाणं श्रद्धांजली म्हणून गायचे आणि गाण्याच्या रूपाने “बाबासाहेबांना श्रद्धांजली” द्यायची असे ठरवले…

त्या कार्यक्रमाची तारीख ठरली… अंधेरी मधला एक हॉल निश्चित झाला आणि कार्यक्रम वेळेत सुरु झाला. त्या कार्यक्रमाला “वामनदादा कर्डक, भिकू भंडारे , गोविंद म्हशीलकर , “प्रल्हाद दादा शिंदे , “विठ्ठल उमप, विठ्ठल शिंदे, आणि “अण्णाभाऊ साठे, असे नामचीन बरेच गायक मंडळी उपस्थितीत होती.

या कार्यक्रमाला सगळेजण स्टेजवर बसून सगळी गायक मंडळी आणि शाहीर मंडळी स्वता:चे आप-आपले गाणे सादर करत होते. या सगळ्यांचे गाण सादर झाल्यानंतर शेवटी फक्त एकच गायक, एकच शाहीर राहिले होते आणि ते म्हणजे “अण्णाभाऊ साठे”… तर त्यावेळेस ख्यातनाम कवी, गायक “वामनदादा कर्डक” अण्णाभाऊंना बोलतात कि “आण्णा” तुला गाणे नाही बोलायचे का…,आणि तू तर गाणे पण लिहून आणले नाही, मग तू “बाबासाहेबांना” गाण्याच्या रूपाने श्रद्धांजली कसा वाहणार गाणे कसा बोलणार…??

मग त्यानंतर “अण्णाभाऊ साठे” खिश्यातून पेन आणि कागद काढतात आणि त्यानंतर ते गाणे लिहायला सुरुवात करतात… आणि त्या लिखाणाची, त्या कवितेची, त्या गीतेची सुरुवात आण्णाभाऊ “जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला “भीमराव” ह्या ओळीने करतात…
आणि ते गाण सगळ्या देशात, संपुर्ण महाराष्ट्रात हे गाणं ऐवढ गाजतं कि त्या गाण्याला देशात कुठेच तोड नाही आणि सगळ्यांना हे गाणं हव हवेसे हे गान झाल आहे… सर्वाना हे गाणं जीवन जगण्यास प्रेरणा देतं. मी खाली ते गाणं देत आहे.

“जग बदल घालुनी घाव”…

जग बदल घालूनी घाव । सांगुनी गेले मज “भीमराव” ।।
“गुलामगिरीच्या या चिखलात । रुतुन बसला का ऐरावत ।।
अंग झाडूनी निघ बाहेरी । घे बिनीवरती घाव ।।
धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले ।।
मगराने जणू माणिक गिळीले । चोर जहाले साव ।।
ठरवून आम्हा हीन अवमानीत । जन्मोजन्मी करुनी अंकित ।।
जिणे लादून वर अवमानीत । निर्मुन हा भेदभाव ।।
एकजुटीच्या या रथावरती । आरूढ होऊनी चलबा पुढती ।।
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती । करी प्रगट निज नाव ।।

गीतकार- अण्णाभाऊ साठे.

“अण्णाभाऊनी” “डॉ. “बाबासाहेब आंबेडकर” यांच्यावर फक्त जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव हे गीत लीहले आहे… जेव्हा एका पत्रकाराने अण्णाभाऊ यांना विचारले…. अण्णाभाऊ तुम्ही बाबासाहेब यांच्यावर कादंबरी का नाही लिहली ?? तेव्हा अण्णभाऊ त्या पत्रकारावर संतापले आणि म्हणाले… अरे “बाबासाहेब सूर्य” आहे आणि त्या “सुर्याला मी एका पुस्तकांत, कैद करूच शकत नाही….? ज्यांनी “बाबासाहेबांवर” पुस्तकं लिहली त्याच्या लेखणीला आणि त्यांना माझा दंडवत. “बघा किती आदर, करत होते “अण्णाभाऊ, “बाबासाहेब” यांचा.
“अण्णाभाऊ साठे” यांचे “फकिरा” कादंबरी, मध्ये “डॉ बाबासाहेब आंबेडकर” यांच्यावर असलेले प्रेमं” –

“लौकर चला ! बेडसगावच्या त्या बामनाच्या वाड्यात ती दौलत अडकून पडलीय” फकिरा आवाज चढवीत म्हणाला,”तिला मोकळी करा ! हो , पन आदी मला आईला , बाबाला , थोरल्या आईला एकदम भेटून येऊ दे. पर तुम्ही मानसांची जुळनी करा ! शंभर मानसं कडवी घ्या नि चला”

हे सारं भिवानं ऐकलं होतं. तो पुढं म्हणाला , “पर बामनाकडं बंदूक हाय. आनी बंदुकीपुढं बळ बेकार व्हतं. भलताच मार हाय, म्हनं”
“माझं बळ तोफेपुढे बेकार व्हनार हाय !” फकिरा तीव्र स्वरात म्हणाला , “बंदूक ? असू दे बंदूक ! किती गोळ्या उडवील ती ? एक एक मानूस दहादहा गोळ्या खाऊ या ! पन जरा मानसावानी नि हिंमतीनं ! पंत म्हनीत , एक राजा हतं झाला. त्येचं नाव मी इसरलो. त्यो राजा म्हनत व्हता , शेळी हूनशान शंभर वर्सं जगन्यापरास वाघ हूनशान एक दिवस जगावं. आनी त्येच खरं हाय. वाघच होऊ नि वाघासारखं मरू या ! चला . जमवा मानसं नि चला”
Ya परिच्छेदातील ” त्यो राजा म्हनत व्हता, “शेळी हूनशान शंभर” वर्सं, जगन्यापरास “वाघ हूनशान एक दिवस जगावं….? ” हे वाक्य कुणासाठी आलं असेल ? अर्थातच “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांना “अण्णाभाऊ साठे’ यांनी केलेले हे मानाचे वंदन आहे… “फकिरा” या बहुचर्चित कादंबरीत बेडसगावचा खजिना लुटण्याची योजना आखतो तेव्हा भिवा शंका व्यक्त करतो म्हणून फकिरा त्याला वरील उत्तर देतो. याच कादंबरीत जॉन साहेबांपुढे समर्पण करताना फकिराने हातातली तलवार टेबलवर ठेवली तेव्हा जॉन साहेब फकिराला विचारतात ,”ही तलवार कुठं मिळाली ? ” तेव्हा फकिरा म्हणतो , ” ही तलवार माझ्या पूर्वजाला शिवाजीराजानं दिली ” ही तलवार घेऊन माझा बाप खोतासंग लढला नि मी हिला घेऊन तुमच्याशी लढलो ” तलवारीला धार नसेल तर , ती काय कामाची ? धारं वाचून तलवार नि बळावाचून बंड लटकं असतं “छत्रपति शिवराय आणि क्रांतिसूर्य भीमरायांच्या” स्वाभिमानी हिंमतबाज, लढयाला अण्णाभाऊ आपल्या कादंबरीतून केवळ वंदन करीत नाही तर ती जनतेपुढे आणून “प्रेरणा” देतात. “फकिरा” हे “अण्णाभाऊ साठे” यांचे मामा होते.

“मांग- ‘महारांच्या” शौर्याची गाथा” असलेली ही “कादंबरी” अण्णाभाऊनी,” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना” अर्पण केली आहे.

“मातंग’ समाजाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे.. ही “आंबेडकरी साहीत्यात” आहे ,जर “भारतातील सर्व “दलीत” समाज मग ताे कुठल्याही जातीचा असाे ताे, डॉ.”बाबासाहेब आंबेडकरांना” बाप” मानून “आंबेडकरी चळवळ” मजबूत” करताे.. तर तुम्ही मागे का?..”आंबेडकरी चळवळ” ही फक्त “महार”(Buddhist) नाही आहे, तर सर्व “मानव जाती”ची आहे ,”सर्वात प्रथम” आपन हे डाेक्यातून काढल पाहीजे की Dr.”बाबासाहेब” फक्त “महार”(Buddhist) आहेत. तर “बाबासाहेब” जेवढे “महार”(Buddhist) आहेत, तेवढेच ते “मांगांचे” “चांभारां” चे आणी “सर्व शाेषीत, जातींचे आहे.. ,”मांगा,नी मागे राहू नये.. “दलीत” “आंबेडकरी चळवळ” आता “मांगानी पुढे न्यावी हीच “बाबासाहेब ,आण्णा भाऊ साठेनां, आदरांजली ठरेल.

“मातंग'(मांग) आणि “महार”(Buddhist.) या दोघांचे नावे इतिहासात सोबतच घेतले जातात..? जसे दोघे “सक्के भाऊ” च आहेत , आणि ते मुळात” आहेतच “भावंड”….
जिथे “मांग” तिथे “महार”(Buddhist.) असतातच व जिथे “महार”(Buddhist.) तिथे “मातंग”( मांग) असतातच, दोघांनी आपली साथ कधीच सोडलेली दिसत नाही.. जरी ते एकमेकांना वर रुसतील, फुगतील, पण “दोघे सोबतच वावरताना दिसतात

कोणी सवर्ण, (“मांगा महारांची लोकं “) असे उदगार काढतात तेही दोघांची नावे सोबतच घेतात ही “साक्ष” आहे. की दोघेही पूर्वीपासून एकमेकांना सोबतीच राहिलेले आहे…
“मातंग” समाजाने अगोदर घरातील “देव्हाऱ्याला” तडीपार करायला हवं..समाजाचे सर्वात जास्त “वाटोळं” या “देव्हाऱ्याने” केलं आहे…

” डॉ बाबासाहेब आंबेडकर” यांच्या “सत्कार्यातून प्रेरणा” घेऊन, “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यांनी “कष्टकरी समाजाचे दारूण चित्र आपल्या लेखणीने भारतीय समाजापुढे मांडले…?”डाॅ.बाबासाहेब आंबेडकर” यांनी”शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.हा मूलमंत्र अखिल मानव जातीला दिला. याचे “अवलोकन” करून “मातंग समाजाने” “आत्मपरीक्षण” करण्याची आवश्यकता आहे…? “मातंग नेते मंडळी,
“खोटा इतिहास” आणि “पेशवाईचा काळ”

पुढील भागात
मुक्तीदाता विशेषांक

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!