
बौद्धांनो
दीपदान उत्सवाचा नावाखाली
दिवाळी साजरी करण्याचा
मुर्खपणा करू नका…
दिवाळी हा
हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण
मानला जातो
हा सण बौद्धांचा नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
हिंदू धर्मातील सण, उत्सव नाकारले आहेत तरीही
काही भंतेजी व धम्म प्रचारक
हिंदू परंपरा व सण
बौद्ध धम्मात घुसविण्याचा प्रयत्न
करीत आहेत
हिंदू धर्मातील सण
बौद्धांचेच सण उत्सव आहेत असं सांगून ते साजरे करण्यास सांगत आहेत
आता तर नविनच नाटकं सुरू झाले
दीपदान उत्सव सांगून बौद्धांना दिवाळी साजरी करण्यास आणि
दिवे लावण्यास सांगितल्या जात आहे
बौद्ध साहित्यात कुठेही दीपदान उत्सवाचा उल्लेख नसताना
चुकीचा इतिहास सांगून
दिवाळी साजरी करायला लावण्याचे
एक षडयंत्र आहे
हे बौद्धांनी लक्षात घ्यावे
सारीपुत्त आणि महामोग्गलान ज्यांना धम्मसेनापती म्हटल्या जाते
त्या महामोग्गलानची हत्या दिवाळीच्या
दिवशी करण्यात आली
इडा पिडा टळो व बळीचे राज्य येवो अशी
म्हण आहे
या म्हणीचा माध्यमातून बळीचे राज्य
पाहिजे अशी अपेक्षा आहे
त्या बळी राजाचा खून दिवाळीच्या दिवशी झाला
हा इतिहास विसरून चालणार नाही त्यामुळे
बौद्धांनो
दीपदान उत्सवाच्या नावाखाली
दिवाळी साजरी करण्याचा
मुर्खपणा करू नका…
आंनदोत्सव साजरा करायचा आहे तर
आपल्या बापाची म्हणजे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या आनंदाने उत्साहात साजरी करा
ज्यांनी आम्हाला
जनावरापेक्षाही नीच जीवनातून बाहेर काढून
आमच्या जीवनाचं सोनं केलं
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी आम्हाला जीवनभर संघर्ष करून
ज्या हिंदू धर्म रूढी ,परंपरा व कर्मकांडातून मुक्त केलं परत
त्याच धर्मातील सण, उत्सव आणि परंपरा यात अडकून त्यातील सण, उत्सव
साजरे करू नका
जर आजही तुम्ही जुन्या रूढी, परंपरा
पाळत असाल तर
तुम्ही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी
बेईमानी करत आहात
दिवाळीच्या दिवशी
दीपदान उत्सव साजरा करायला सांगणाऱ्याना
विचारा की
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
दीपदान उत्सव याचा उल्लेख कुठे केला आहे…? किंवा
बौद्ध साहित्यात कुठे लिहिलं आहे…?
संपूर्ण बौद्ध साहित्यात कुठेही
याचा उल्लेख नाही
त्यामुळे
दीपदान उत्सव साजरा करावयास लावणे म्हणजे
दिवाळी साजरी करणे होय…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी
मानसिक गुलामीतून तसेच हिंदू धर्माच्या रूढी, परंपरा, संस्कृतीच्या
बंधनातून आपल्याला मुक्त केले आहे
त्यामुळे
दिवाळी किंवा दीपदान उत्सव
साजरा करणे म्हणजे
मानसिक गुलामगिरीकडे परत वाटचाल करणे होय…
🙏🙏🙏जयभीम🙏🙏🙏
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत


