सत्य निर्भयपणे सांगण्याची ताकद फक्त न्याय व्यवस्थेतच आहे : एस.के. गायकवाड

नळदुर्ग येथे भारत सरकारची नोटरी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
राजकीय चळवळीतील मंत्री, लोक प्रतिनिधीना काही सामाजिक हितसंबध जोपासायचे असतात काहींची मर्जी सांभाळावयाची असते त्यामुळे ते कधिकधि असत्याला पाठीसी घालण्याचा प्रयत्न करत असतात परंतू भारतीय राज्य घटनेने न्याय व्यवस्थेला स्वतंत्र स्वायत्तेचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे निर्भयपणे सत्यता पडताळून ते सत्ये सांगण्याची ताकद फक्त आणि फक्त न्यायव्यवस्थेतच आहे. म्हणूनचं आजही न्यायालयावर जनतेचा विश्वास असल्याने न्यायव्यवस्थेलाचं न्याय देवता असे संबोधले जाते. तेंव्हा वकिलानी निव्वळ व्यवसाय न पहाता एकादा निरापराधी व्यक्तीवर अन्याय होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन रिपाइं (आठवले ) चे धाराशिव जिल्हा सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते एस.के.गायकवाड यानी केले.
नळदुर्ग येथील अँड.अभिजीत बाबुराव बनसोडे यानी लोकमान्य वाचनालयाच्या गाळ्यात सुरु करण्यात आलेल्या भारत सरकाराची नोटरी सेवा संपर्क कार्यालयाचे उदघाटन रिपाइं (आठवले) पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबुराव बनसोडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.या प्रसंगी एस. के. गायकवाड बोलत होते. प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिक बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे सर्वाना त्रिशरण पंचशिल दिले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या वतीने अँड.अभिजीत बनसोडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे यानी केले तर अभारप्रदर्शन रिपाइं (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यानी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्य प्रवर्तक संस्थापक मारुती खारवे पत्रकार सुनिल बनसोडे, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, रिपाइं (आठवले)चे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे,उपाध्यक्ष महादेव कांबळे,रिपाइं (आठवले) रिपाइं चे नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे,आरविंद लोखंडे, अँड.मतीन बडिवाले, सामाजिक कार्यकर्ते डॉ सतीश खारवे , सचिन कांबळे पारधी समाजातील नेते पंडीत भोसले कार्यकर्ते,धर्मराज देडे, प्रथम बनसोडे किशोर धुमाळ ,सह कार्यकर्ते महिला मोठ्या संखेने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत