मुख्यपानसंपादकीय

कांचेच्या घरात राहणाऱ्यांनी ..रणजित मेश्राम

वाचतांना, ऐकतांना हा संवाद सहज ध्यानीकानी येतो. बघ, काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगड फेकू नये.

सुसाट वेगाने अर्थबोध होतो. इतका या संवादात दमखम आहे. कुणाला काय सांगायचे ते हे हुकमी सांगणे असते. तिथे फार स्पष्टीकरणाची गरज नसते. सत्तरीत हा संवाद खूप गाजला होता. या काळात या संवादाने ‘थियेटर’ डोक्यावर घेतले होते. तो ‘वक्त’चा वक्त होता. राजकुमार या नटाची देहबोली, संवादफेक याची दिवानगी होती.
‘स्विमिंग पूल’ वरील ते दृश असावे. राजकुमार आणि रहमान या नटांची संवाद चकमक असते.
राजकुमार म्हणतो, चुनायसेठ अगर मै ना करु तो …
रहमान .. राजा, तू तो जानता है. मै जितनी मोहब्बत करता हूं .. उतनी नफरत भी .. !
तेव्हा राजकुमार (राजा) उभा होतो व म्हणतो .. ‘मोहब्बत और नफरत .. चुनायसेठ, जिनके अपने घर शिसे के हो, वो दुसरोपर पत्थर नही फेका करते’. (टचकन हातातील ग्लास फोडतो) .
संवाद ऐकताच अख्खे थियेटर वेडे होत असते.

हे का सांगतोय. संदर्भ प्रसंग वेगळा आहे. चाळीशीतही असा संवाद गाजला होता. मात्र, बाबासाहेबांनी तो लिहिला होता. तेव्हाची ती गरज होती. १९३६ चे दरम्यान चे आहे. लाहोरच्या जातपात तोडक मंडळापूढे न झालेले भाषण बाबासाहेबांनी प्रसिद्ध केले. नाव दिले, Annihilation of caste (जातीचे निर्मुलन). इंग्रजी आवृत्ती दोन महिन्यातच संपली. प्रादेशिक भाषांत झपाट्याने अनुवाद झाले. पुस्तकाला खूप मागणी होती. बाजूने-विरोधात दोन्हीकडे चर्चा असे. विशेष म्हणजे, महात्मा गांधीजींनी या पुस्तकाची (प्रबंधाची) दखल घेतली. हरिजन मध्ये समीक्षा लिहिली. बाबासाहेबांच्या विद्वत्तेची स्तुती करतांनाच कडक आणि कडवट टीका केली. तेव्हा तिही गाजली.

या टीकेला बाबासाहेबांनी तेव्हा आपल्या शैलीने समर्पक उत्तर दिले. ते उत्तर conclude करतांना बाबासाहेब लिहितात,
‘Who could cast a stone at me ? Surely not those, who like the Mahatma live in glass houses’.

  • रणजित मेश्राम

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!