एक वही एक पेन अभियान …

एक वही एक पेन अभियान राबविण्यात असताना Dighanchi येथे नाथ पंथी डवरी गोसावी समाजातील पालावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या दरम्यान दहा मुले मुली शाळेत जात नाहीत…
त्यातील नाव बदलून नागनाथ सावंत नावाचा मुलगा शाळाबाह्य आढळून आला आहे. तो साधारणपणे 10 वर्षाचा आहे. इथे गावात भिक्षा मागून जे काही खायाला मिळेल ते खातो. पोटासाठी भिक्षा मागायला लागणे हे समाजाचे वास्तव चित्र आहे ते बदलले पाहिजे. कारण पालावर येऊन शाळेत जा म्हणून सांगायला कोण येणार. ते अजून जास्तच मागास राहणार आहेत.
यांचेतील शासकीय अधिकारी, नोकरी असणारे समाज बांधव यांची मान कमी होईल, अपमान होईल, स्टेटस यामुळे पालावर येत नाहीत, समाजाचे आरक्षणाचा फायदा मात्र घेतात. कोरोना काळात समाजाला काही बांधवांनी मदत केली व अडी अडचणीच्या काळात काही वेळा मदत करतात. मोठे हरीचांद्र दानशूर असलेला आव आणतात.
पद, प्रतिष्ठा, गाडी, बंगला, मी मोठा, मान पान यात अडकलेला समाज सुधारायचा तसूभर विचार ही करत नाही. या मोठ्या पदावर असणाऱ्या समाज बांधव यांना एकत्र बोलावले तर गट तट पाडून भांडण करतात. काय अपेक्षा यांचेकडून करायची.
पुढच्या समाज बांधव यांची मानहानी व अपमानित करणे हा एकच अजेंडा यांचा असतो, यामुळे आपण आपल्या परीने काम करत राहणे सुरू आहे….
डॉ कालिदास शिंदे
झोळी
9823985351
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत