जोर जबरदस्तीने धर्मांतर करणे ही बुद्धिस्टांची परंपरा नाही

” हिवाळी अधिवेशनामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा येणार.”अशा मथळ्याची बातमी दैनिक देशोन्नतीमध्ये दिनांक 15 जुलै 2025 ला मुखपृष्ठावरच मी वाचली. यामध्ये म्हटले आहे की पंडित रमाबाई मुक्ती मिशन आश्रमामध्ये अनाथ मुली आणि महिलांचे धर्मांतरण केल्या जात असल्याचा उल्लेख आहे. तुमच्या खात्रीसाठी बातमी खाली दिलेली आहे.
केवळ बौद्ध धम्माच्या संदर्भामध्येच म्हटल्या जाऊ शकते की या धम्मामध्ये धर्मांधतेला कुठलेही स्थान नाही. धम्माचा उद्देश स्वतःचा संयम आणि स्वतःच्या साधनेद्वारे मानवांमध्ये एक अंतर्गत परिवर्तन आणणे आहे तर मग हा धम्म कोणासोबतही धर्म परिवर्तन करण्यासाठी जबरदस्ती करूच कसा शकतो. धनसंपत्तीचा उपयोग सुद्धा कसा करू शकतो? तथागतांनी केवळ मुक्तीचा मार्ग दाखविलेला आहे. आता प्रत्येक व्यक्तीचे काम आहे की त्याने स्वतःच्या मुक्तीसाठी त्या मार्गावर स्वतः चालायचे की नाही याचा निश्चय त्याला स्वतः करायचा आहे.
प्रत्येक धर्म कुठली ना कुठली गरज भागवीत असतो आणि कुठल्या ना कुठल्या प्रवृत्तीकडे त्याला घेऊन जात आहे. पहिल्यांदा तो धर्म कितीही खोटा विश्वास पूर्ण वाटेल, ती काही अंशी मूलभूत स्वभाव धर्माची बाह्य अभिव्यक्ती असते आणि म्हणून त्यामध्ये काही सत्यांश असते. बुद्ध धम्माचा प्रयत्न त्या सत्याकडे दिशा निर्देश करणे आहे आणि त्याची एक नवीन सर्वश्रेष्ठ व्याख्या करून त्याला एक नवीन आणि अतिशय गुणयुक्त स्वरूप देणे आहे. तथागतांनी म्हटलेले आहे-
” स्वतःच्या आस्थ्येवर श्रद्धा ठेवा दुसऱ्याच्या आस्थेची निंदा करू नका, जो प्रकाश तुम्ही पहात आहे तो निर्वाणरुपी सूर्य आहे. जो उगवतानाच एखाद्या चांगल्या दिवसाची आशा निर्माण करीत आहे. कमजोर किरण दुसऱ्यांचा मार्ग प्रकाशित करीत आहे, तो त्याचा स्वतःचा किरण आहे. ज्यामध्ये भ्रम दिलेला आहे जो होऊन गेलेल्या रात्रीची छाया आहे.”
म्हणूनच जगभरातील बौद्ध सम्राट सर्वात जास्त सहनशील आणि उदार राहिलेले आहे. सम्राट अशोक स्वतः एक खंबीर बौद्ध होते, तरीसुद्धा त्याने ब्राह्मणांना (विद्वानांना) जैनाना आजीवकांना आणि बौद्धांना सुद्धा अनुदान दिले. आपल्या बाराव्या शिलालेखामध्ये अशोकाने लिहून ठेवले आहे-
” जो कोणी आपल्या संप्रदायाला श्रेष्ठ ठरविण्यासाठी आपल्या संप्रदायाची(धर्म) आकाशाएवढी स्तुती करतो आणि दुसऱ्या संप्रदायाचा(धर्म) विरोध करतो त्याची निंदा करतो, तो स्वतः आपल्या संप्रदायाचे(धर्म)नुकसान करीत असतो.”
श्रीलंकेचे मध्यकालीन बौद्ध राजे आपल्या देशातील सर्व दुसऱ्या विचाराच्या अनुयायांविषयी दयाळू होते आणि त्यांच्या भावनांचा सन्मान करीत होते. बंगालचा पाल वंशाचा राजा हा स्वतः पक्का बौद्ध होता. तरीसुद्धा ब्राह्मणांना दान देत होता. तर दुसऱ्या बाजूला ब्राह्मणांनी केवळ बौद्धांवर अत्याचारच केले नाही तर ते त्यांनी केलेल्या अत्याचारावर गर्व करतात. बंगालचा महान स्मृतिकार शूलपाणी याने बौद्ध व्यक्तीवर नजर जरी पडली तरी त्याला त्याने पाप घोषित केले आहे आणि त्यासाठी कठोर प्रायचित्त याची व्यवस्था केलेली आहे. परंतु बौद्ध अत्याचार ग्रस्त असताना सुद्धा त्यांनी कधी बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून कोणावरही अत्याचार केलेली नाही.
बौद्ध धम्म आपल्या विचाराचा जो प्रचार आणि प्रसार करतो ती त्याची जन्मजात विशेषता आहे. ब्राह्मणी धर्माची ही विशेषता वरवरची आहे. ब्राह्मणांना केवळ एकट्याला घमेंडी जीवन जगणे पसंत आहे आणि तो तसे जीवन जगत आलेलाच आहे आणि आताही जगत आहे.
दुसऱ्या बाजूला बौद्ध भिक्खु त्याच्या धम्मपचा प्रचार केल्याशिवाय राहू शकत नाही. हा प्रचार करत असताना प्रेम भावनेतून केल्या जावा ही शिस्त तथागतांनी शिकविलेली आहे. तथागतांच्या धम्मामध्ये इतकी प्रचंड प्रेरणा आहे, की या प्रेरणेमुळेच फाह्याण, व्हेनसाँग, इत्तसिंग चीन वरून पैदल भारतामध्ये आले होते. त्यासाठी त्यांनी भयंकर अशा बर्फाळ, पर्वत आणि वाळवंटाचा सामना केलेला आहे.
बौद्ध धम्माने कोणत्याही शस्त्राचा, बंदुकीचा, तोफांचा सहारा न घेता आशियामधील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या प्रदेशांमध्ये आपल्या शांती आणि सद्भावनेचा संदेश सर्वत्र जंगली लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना सभ्य बनविले. एखाद्या धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याने कोणी बौद्ध होत नाही त्यासाठी पूर्वीचे धर्मांधि विचार सोडून द्यावे लागतात. म्हणजे अंतर्गत वैचारिक परिवर्तन जोकर तो आणि धम्माचे आचरण करतो तोच बुद्धिस्ट होय मग त्याचा धर्म कोणता आहे याच्याशी काही देणे घेणे नाही. जबरदस्ती धर्मांतरण केल्याने वैचारिक परिवर्तन होत नाही म्हणून असल्या धर्म परिवर्तनावर बुद्धिस्ट लोकांचा विश्वास नाही, कारण जबरदस्तीने धर्मांतरण करणे ही बुद्धिस्टांची परंपरा नाही.
सनातनी बुद्धिस्ट गंगाधर नाखले
16/07/2025,7972722081
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत