छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्याची जागतिक पातळीवर दखल

नळदुर्ग नगरीचे माजी नगर विनायक अहंकारी यांनी केले साखर वाटून आनंदोत्सव साजरा .
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग शहरात माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्यास जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याने साखर वाटप करुन आनंद उत्सव साजरा केला
नुकत्याच जाहिर झालेल्या युनेस्केने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्याचा जागतिक वारसा यादीत सहभाग जाहिर केला आहे ही बाब संपूर्ण देशासाठी अभिमानाची आणि गौरवास्पद आहे
नळदुर्ग शहरात माजी नगरसेवक व ब्राह्मण समाज संघटनेचे अध्यक्ष तथा शिवप्रेमी विनायक अहंकारी यांनी नळदुर्ग शहराच्या मुख्य बाजार पेठेत हालगीच्या निनादत शहरात साखर वाटप केली
नळदुर्ग शहरामध्ये शिवरायांचा इतिहास लोकांपर्यंत पोहंचविण्याचा प्रत्यन विनायक अहंकारी सातत्याने करत असतात शिवाय नळदुर्ग शहराच्या अनेक कार्यक्रमात आग्रेसर आसुन ते पुढे होऊन कार्यक्रम पार पाडतात .
शिवजयंती निमित्त स्वतःच्या घरात शिवजन्म पाळणा सुरु करुन विनायक अहंकारी यांनी एक नवा आदर्श उभा केला आहे अशा अनेक सामाजिक कार्यात त्यांनी नळदुर्ग शहरासाठी निर्माण केले आहे.
यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांचे आभार व्यक्त केले आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत