पुरस्कारवीर प्रधानमंत्री !

🌻रणजित मेश्राम लेखक जेष्ठ विचारवंत अभ्यास क साहित्यिक समीक्षक आहेत
आपले देशप्रमुख जगप्रिय आहेत. सन्मानांचा तसा ध्वनी आहे. नुकतेच ते घरी परतले. चार देशांचा सन्मान घेऊन. शेवटचा सन्मान नामीबियाने दिला. 'सर्वोच्च नागरिक' सन्मान.
असे आंतरराष्ट्रीय सन्मान २७ झालेत. हा नवा उच्चांक.
नामीबिया दक्षिण आफ्रिकेतील. जगातील सर्वात कमी जनसंख्या असलेला देश. जनसंख्या केवळ ३० लाख. ३० लाखाने १४३ कोटीचा सत्कार केला. एक सर्वात कमी , एक सर्वात जास्त. हा नवा विरोधाभास ! ढोल बडवून सत्कार झाला. राष्ट्रपती मेटुम्बो नी केला.
ट्रम्प किंवा पुतिन यांचेपूढे असे ढोल बडवता आले असते काय ? तेही उघडेनागडे नाचून. पण हे प्रश्न फालतू आहेत. जागतिक प्राप्ती महत्वाची. शिवाय संस्कृती उपासक.
आतापावेतो पुढील देशांनी देशप्रमुखांचा सत्कार केलाय. २०११ पासून ही नावे क्रमाक्रमाने आहेत.
यात , सऊदी अरब , अफगाणिस्तान , फिलिस्तीन , संयुक्त अरब , अमीरात , रशिया , मालदीव , बहरीन , अमेरिका , भूटान , फिजी , पापुआ न्यूगिनी , मिस्त्र , फ्रांस , ग्रीस , डोमिनिका , नाइजीरिया , गुयाना , बारबाडोस , कुवैत , माॅरीशस , श्रीलंका , साइप्रस , घाना , त्रिनिदाद टोबैगो , अर्जेंटिना व शेवटी नामीबिया या देशांचा समावेश आहे.
२०२९ पर्यंत कार्यकाळ आहे. सन्मानसंख्या अधिक वाढू शकेल.
आपले मान्यवर यात रमतात. तो छंद त्यांनी जोपासलाय. फिरणे आवडते. फिरत असतात. नवनवे करार करतात. नवनवे उच्चांक होतात. हीही प्रप्तीच !
आधी दोन उच्चांक झालेच आहेत. एक सर्वाधिक विदेशवाऱ्या ! त्या ९० झाल्यात. दूसरे , एका वारीत सर्वाधिक काळ घराबाहेर राहण्याचा ! तोही घडला. याच वारीत. छान चाललेय. विदेशनिती अशी वारीत गुंतलीय.
वारीचे नवनवे निमित्त येतातच. मान्यवर तरी काय करणार ? जग त्यांना हाक देतेय.
कदाचित जगाला ते हवहवेसे असावेत. तेही नवे पायंडे पाडत आहेत. हस्तांदोलन ! छे ! पश्चिमी झाले. जुनेही झाले. सरळ गळाभेट ! डाव्या हाताने पाठ थोपटणे ! सारे मस्त आहे. 'स्माईल' वगैरे. नकोय ते ! सरळ हसावे. खदादून हसावे. छोटामोठा विनोद करावा.
याला म्हणतात .. भेट .. भेटणे .. !
आता घरी आले आहेत. इथे आले की गंभीर का होत असतील ? हा देश म्हणजे 'टेंशन' झालाय !
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत