दिन विशेषदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

महाराष्ट्र विधानसभेत १० जुलै रोजी जनसुरक्षा कायदा बहुमताने मंजूर झाला

महाराष्ट्र विधानसभेत १० जुलै रोजी जनसुरक्षा कायदा बहुमताने मंजूर झाला असून, कट्टर डाव्या, नक्षलवादी आणि संविधानविरोधी संघटनांवर कारवाईसाठी हा कायदा महत्त्वाचा आहे असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, हा कायदा अजामीनपात्र असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आणि अंतर्गत सुरक्षेला बळकट करण्याच्या नावाखाली लोकशाहीतील विरोधी आवाज शासन यंत्रणा वापरून बलपूर्वक दाबून टाकणारा आहे असे आमचे मत आहे. कट्टर डाव्या संघटना नकोत हे ठीकच. तर कट्टर उजव्या देशविघातक संघटना का चालाव्यात ? यावर प्रश्न विचारणारी कलीम अजीम यांची पोस्ट शेअर करत आहोत.

या अति कडव्या उजव्या विचारांपासून ‘जनसुरक्षा’ का नको?

१) सामाजिक विभागणी करून द्वेष, तिरस्कार व हिंसेचा प्रसार प्रचार करणे.

२) मुली-महिलांना हल्ले व शारीरिक हिंस्र कृत्याच्या धमक्या देणे.

३) मांस बाळगल्याच्या संशयावरून एखाद्या व्यक्तीचे शिरकाण करणे.

४) विचार पटत नाही म्हणून पळवून अमानवी मारहाण करणे.

५) महिलांची नग्न धिंड काढणे.

६) खालच्या जातीचा आहे म्हणून अंगावर लघवी करणे किंवा पाजण्याचा प्रयत्न करणे.

७) विरोधी विचारांच्या व्यक्तींना धमकावणे, त्यांना देशद्रोही म्हणणे, त्यांच्या विरोधात बदनामीची मोहीम चालवणे.

८) आंदोलकांना देशाचा शत्रू घोषित करणे.

९) सरकार विरोधी लेखक, पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे.

१०) उघडपणे राज्यघटनेची नालस्ती करणे, अवमान करणे.

११) भर चौकात राज्यघटना जाळण्याचा प्रयत्न करणे.

१२) संविधान दिंडी काढली म्हणून अर्बन नक्षली म्हणणे.

१३) धार्मिक व जातीय द्वेष निर्माण करणारी चिथावणीखोर भाषणे देणे.

१४) एखाद्याला धर्मावरून लक्ष्य करणे, त्याची वैयक्तिक सुरक्षा संकटात आणणे.

१५) धार्मिक अल्पसंख्याकांच्या धर्मस्थळांची नासधूस करणे.

१६) न्यायालयावर भगवा फडकविणे.

१७) धार्मिक द्वेषातून एखाद्याला जिवंत जाळणे.

१८) विरोधी पक्षनेत्याची बदनामी करणे.

१९) महिला व मुलींचे अश्लिल फोटो तयार करून लिलाव करणे.

२०) राष्ट्रपिता महात्मा गांधींची अवहेलना करणे.

२१) सरकार विरोधी व्यक्तींना विकृत पद्धतीने ट्रोलिंग करणे.

२२) धार्मिक अल्पसंख्याक विरोधात सांघिक द्वेष मोहीम राबविणे.

२३) भाजप विरोधी मतदारांना पोलिंग बूथवर मतदान करू न देणे, त्यांचे मतदार ओळखपत्र जप्त करणे.

२४) देशविरोधी कृत्य करून शत्रुराष्ट्रांना देशाची गुपित माहिती पुरवणे.

२५) शत्रुराष्ट्रासाठी हेरगिरी करणे.

२६) संसदेत धार्मिक अल्पसंख्याक सदस्यांच्या विरोधात शिवीगाळ करणे.

२७) संसदेच्या सभागृहात विरोधकांना धमकावणे.

२८) जाहीर सभांमधून धार्मिक अल्पसंख्याकांना चोर, लुटारू म्हणणे.

२९) धार्मिक अल्पसंख्याकांवर जीव घेणे हल्ले करणे, त्यांच्या विरोधात बहुसंख्यांक समुदायाला उत्तेजित करणे.

३०) धार्मिक अल्पसंख्यांकांचे राहती घरे बुलडोझर लावून उद्ध्वस्त करणे.

३१) समाजात विभागणी करून देशांतर्गत अराजक माजविणे.

३२) धार्मिक अल्पसंख्याकांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानावर बहिष्कार टाकणे.

३३) धार्मिक अल्पसंख्याकांना गाव बंदीचे आदेश काढणे.

३४) दलित समुदायाला लग्नाची वरात न काढू देणे, आनंद सोहळे साजरे करू न देणे.

३५) संविधान निर्माते आंबेडकरांची जाहीर बदनामी करणे.

३६) शेतकरी-आंदोलकांवर गोळीबार करणे.

३८) विरोधी विचारांच्या राजकीय संघटकांना वर्षानुवर्षे तुरुंगात सडवणे.

३९) विरोधी विचारांच्या राजकीय पुढार्‍यांवर फसवे गुन्हे दाखल करणे.

४०) वैयक्तिक स्वातंत्र्यावर हल्ला चढवणे.

४१) हल्लेखोरांच्या विजयी मिरवणुका काढणे.

४२) सत्तेचा रुबाब दाखवून एखाद्याची जमीन, घरे हडप करणे.

४३) सत्ता पक्षाच्या विचारांचा धाक दाखवून कार्यालयीन सहकाऱ्यांचा छळ करणे.

४४) एखाद्याला सत्ता पक्षाचा समर्थक होण्याची बळजबरी करणे, त्याच्या कृतीवर पाळत ठेवणे.

४५) सरकार विरोधी लिहिले म्हणून खोटे गुन्हे दाखल करणे, तुरुंगात डांबण्यास लावणे.

४६) विरोधी लेखक, पत्रकार, विचारवंत अभ्यासकांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित करणे.

४७) शोषित, पीडित समुदायांना दोषी/गुन्हेगार सिद्ध करणे.

४८) शोषित, पिडिताला न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करणे.
इत्यादी…

थोडक्यात, अति हिंसक विचार सार्वजनिक करून समाजाची जात, धर्म श्रेष्ठत्व, वर्ण, पंथाच्या नावाने विभागणी करणे; या सर्व विदेशी कृतीचा अंतिम परिपाक देशाची अंतर्गत सुरक्षा संकटात आणणे असा होतो, त्यामुळे अशा विघातकी विचारांच्या विरोधात कठोर कायद्याची गरज आहे.
-कलीम अज़ीम, पुणे
११ जुलै २०२५

जनसुरक्षा

जनसुरक्षा_कायदा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!