छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आयोजित छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त काल गुरुवार दिनांक 26 जून 2025 वेळ संध्याकाळी साडेसहा वाजता राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून लातूर येथील ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर सुरेश वाघमारे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय नानासाहेब पाटील माजी नगराध्यक्ष धाराशिव हे लाभले होते कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय दादा गायकवाड यांनी केले आणि पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक जानराव सर यांनी केले डॉक्टर सुरेश वाघमारे म्हणाले शाहू महाराजांच्या विचारांची जगाला ओळख झाली आहे या महापुरुषांच्या विचारांच्या आधारे जगाच्या सीमा पार केलेले आहेत ऑस्ट्रेलियातील महिलांनी बाबासाहेबांचा पुतळा उभा केला आहे स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत या दोन्ही महापुरुषांचा संबंध सामाजिक समतेची आहे परंतु या दोन्ही महापुरुषांच्या जाती निर्मूलनाची चळवळ आज थांबवण्याचा प्रयत्न होत आहे आज जाती कशा घट्ट होतील याचा प्रयत्न चालू आहे त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर वाघमारे सर असं म्हणाले की जाती निर्मूलनाचं काम महात्मा फुलेंनी हाती घेतलं त्याचा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांनी चालवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांची भेट 1920 मध्ये झाली अस्पृश्यता निर्मूलन करण्याचे काम करणाऱ्या राजावरच शूद्र म्हणून घेण्याची नामुष्की आली म्हणून 1950 मध्ये त्यांनी 50% आरक्षणाचा निर्णय घेतला. शाहू महाराज राजा असताना सुद्धा त्यांना धमक्या आल्या परंतु ते डगमगले नाहीत शाहू महाराजांच्या हे लक्षात आले एक तरुण अस्पृश्यांच्या बाजूने लढण्याच्या प्रयत्न करत आहे आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत जो माणूस काँग्रेस टिळक सत्तेला घाबरत नाही हे शाहू महाराजांनी जाणले होते त्याचबरोबर बाबासाहेब म्हणाले की अस्पृश्य निवारण झालं नाही ब्रिटिशा देशातून जातील पण अस्पृश्यता जाणार नाही जातिव्यवस्थेचे कारण अस्पृश्यता हेच आहे ही गोष्ट बाबासाहेबांनी सांगितली परंतु आज समता आणि समरसता यात कन्फ्युजन करण्याचे काम आज होत आहे परंतु अस्पृश्यासाठी लढणारे एकमेव व्यक्ती होते आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या भेटीमुळे शाहू महाराजांना बळ मिळालं परंतु बाबासाहेबांना पाठबळ मिळालं अध्यक्षीय भाषणात नानासाहेब पाटील म्हणाले जाती निर्माण कशा होतात याची विश्लेषण करून जात मोडीत काढायचे असेल तर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांच्या विचाराशिवाय पर्याय नाही आणि त्यानंतर आभार प्रदर्शन बोरसे सर यांनी केले या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच सर्व पदाधिकारी अध्यक्ष अध्यक्ष प्राध्यापक रवी सुरवसे कलासरी सर सचिव डॉक्टर दिनकरराव झेंडे अमोल गडबडे एडवोकेट अजित कांबळे राजेंद्र अंगारके सर पवार सर मस्के सर सवयी सर जानराव सर जागते सर दीपक कांबळे सर रत्नाकर मस्के सर विजयकुमार गायकवाड सर विकास काकडे सर आयु गायकवाड सर या सर्वांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर महिंद्र चंदनशिवे सुदेश माळाळे सुनील भाऊ बनसोडे दादासाहेब जेठी थोर हरिभाऊ बनसोडे रमाई फाउंडेशन चे पृथ्वीराज चिलवंत छाया माळाळे निकिता कांबळे चंदनशिवे मॅडम त्रिशाला ताणांबिर मॅडम त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर प्रेमी जनता नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत