26 जून 2025 रोजी राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांना नियोजित शाक्यसंघ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशिय सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून विशेष ड्रेसकोडमध्ये अभिवादन.

(अशोककुमार दिलपाक)
सोलापूर:- दि.26 जून 2025 रोजी राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांना नियोजित शाक्यसंघ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशिय सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून विशेष ड्रेसकोडमध्ये अभिवादन.
राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्त नियोजित शाक्यसंघ सामाजिक बहुउद्देशिय सामाजिक संस्था, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रथमच ऐतिहासिक दसरा चौक, कोल्हापूर येथे विशेष ड्रेस कोडमध्ये अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी पुढील मान्यवर हजर होते. (प्रकाश आबिटकर (पालकमंत्री), हसन मुश्रीफ, (आरोग्यमंत्री), अमोल येडगे (जिल्हाधिकारी), योगेश कुमार गुप्ता (जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर), एस. कार्तिकेयन (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर) के. मंजूलक्ष्मी (आयुक्त महानगरपालिका, कोल्हापूर), वसंतराव मुळूक (अखिल भारतीय मराठा महासंघ), इंद्रजीत सावंत (तज्ञ इतिहास संशोधक), राजर्षी शाहुजी सलोखा (मंच कोल्हापूर) यांचे उपस्थित सदरचा कार्यक्रम पार पाडला त्यावेळी विविध सामाजिक संघटना, तसेच शाहुजीप्रेमी व विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला सांगितले होते की, राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती सणा प्रमाणे साजरी करा असा संदेश दिला होता. या भावनेतून राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जन्म भूमीत अभिवादन करण्यासाठी सोलापूर, पुणे, बीड, कोल्हापूर इत्यादी जिल्हयातून विशेष ड्रेसकोडमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी बौध्द उपासक व उपासिका प्रथमच हजर होत्या.
त्यानंतर सदर विशेष पथकाने शाहुजी महाराज चित्रमय प्रदर्शन, शाहुजी जन्मस्थळ, शाहूजी समाधी स्थळ यासह छत्रपती शाहु महाराजाच्या वास्तुंना भेटी दिल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत