“महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ, दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला कोणी वाली आहे का नाही?”

महाराष्ट्रात भयंकर असा दुष्काळ पडला असून शेतकऱ्याच्या गाई जनावरांना खायला चारा नाही जिथे उपलब्ध आहेत ते 80 हजार रुपये एकराने मका किंवा इतर चारा मिळत आहे त्याची तोडणी आणि त्याची कटिंग केले असता 1 लाख रुपये एकर याप्रमाणे खर्च होत आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्याला मदत करण्याचे सोडून हे सरकार शेतकऱ्याला गाडण्याचा प्रयत्न करत आहे 34 रुपये लिटर प्रमाणे भाव फिक्स केले असून त्याचा कोणताही जीआर न काढल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व डेअरी उत्पादन करणारे फॅक्टरी मालक व सरकारी संघानी 30 ते 32 रुपये प्रति लिटर भाव प्रमाणे भाव देत आहे मार्केटमध्ये मिळणारे जनावरांना खाद्य त्याचे प्रति दोन रुपये किलो प्रमाणे भाव वाढले असून शेतकरी मेटीकोटीस आलेला आहे आज 1,50 लाख रुपयाच्या गायची किंमत दुष्काळामुळे चाळीस ते पन्नास हजारावर आली आहे लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या गाई भे भावात विकल्या जात आहे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला कोणी वाली आहे का हा प्रश्न पडला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत