अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला, 200 जण जखमी.

अपघाती मृत्यू झालेल्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांवर आणि जमलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला करून 200 नागरिकांना जखमी केले आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील बाम्हणी या गावातील स्मशानभूमीत घडली आहे.काल रविवारी (24 सप्टेंबर) रात्री समोर आली आहे. शुभम भोयर या तरुणाचा अपघातात शनिवारी (23 सप्टेंबर) रात्री मृत्यू झाला. शुभम भोयर आणि त्याचा चुलत भाऊ मयूर भोयर दोघे दुचाकीवर जात असताना अपघात झाला. त्यात शुभम भोयर याचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला होता. त्याच्यावर बाम्हणी गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्याच्या अंत्ययात्रेवेळी मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले नागरिक घाबरले आणि वाच दिसेल तिकडेपळत सुटले. प्रेत तिथेच सोडून लोक पळाले. काही नागरिक गावाच्या दिशेने पळाले, तर काही जण गाडीवर गेले. काहींनी नदी पात्रात उडी घेतली.
परंतु मधमाशांनी केलेल्या हल्ल्यादरम्यान 200 नागरिक किरकोळ जखमी झाले. मधमाशांच्या हल्ल्यानंतर जखमी नागरिकांनी नदीच्या पैलतिरी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर खासगी रुग्णालय गाठून तिथे उपचार घेतले आणि त्यानंतर घरी परतले. परंतु या हल्ल्यामुळे नागरिकांची चांगली दमछाक झाली.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत