एक लाख समता सैनिक तयार करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पाच सैनिक करावेत

-अँड एस के भंडारे
पुणे (संघसेन यांचेकडून) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेच्या विरुद्ध लढण्यासाठी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या 2027रोजीच्या शतक महोत्सव पर्यंत डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 1लाख सैनिक तयार करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने किमान पाच सैनिक करावेत असे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर अँड एस के भंडारे यांनी पुणे जवळील लोणी काळभोर, ता.हवेलीच्या पालखी तळावर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या पुणे पूर्व जिल्हा व हवेली पूर्व तालुका शाखा च्या वतीने पुणे पूर्व जिल्हा, पुणे पश्चिम जिल्हा, पुणे महानगर जिल्हा आणि पिंपरी चिंचवड जिल्हा शाखेच्या सैनिक अधिकाऱ्यांचा दि.20/4/2025 रोजी संविधान समर्थक समाज जोडो अभियान अंतर्गत समता सैनिक दल मेळावा प्रसंगी समता सैनिक दल काल, आज आणि उद्या विषयावर व मेळाव्याचे उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे पूर्व जिल्हा शाखेचे अध्यक्ष बी जी घाटे होते. अँड एस के भंडारे पुढे असे म्हणाले की, आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1938मध्ये सांगलीतील इस्लामपूर येथे आपली अमूल्य मते विकू नका असा संदेश दिला त्याचा वर्धापन दिन असल्याचे सांगून आजची परिस्थिती बघता समाजाने मते विकू नयेत यासाठी सुद्धा काम करावे लागेल .शिक्षण दारे खुले करणारे महात्मा फुले व सावित्रीमाई, पेशवाई संपविणारे महार सैनिक,संभाजी राजे यांचे दहन करणारे वामन , न्यायमूर्ती रानडे, महर्षी धोंडू केशव कर्वे इत्यादींचा वारसा असलेले पुणेकर आत्यंतिक कणखर आहात त्यामुळे सर्व संविधान समर्थक समाज जोडून समतेची चळवळ मजबूत करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. तसेच भंडारे यांनी पुण्यात चालत असलेल्या साप्ताहिक परेड उपक्रमाचे कौतुक केले.
या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यू जी बोराडे, असिस्टंट स्टाफ ऑफिसर व राज्य संघटक दादासाहेब भोसले (सातारा), असिस्टंट लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळे,(पुणे), पुणे पश्चिम जिल्हा अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ, पुणे महानगर जिल्हा अध्यक्ष मेजर राजरत्न थोरात, पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष राधाकांत कांबळे , पुणे महानगर महिला जिल्हा अध्यक्ष सुनीताताई रोकडे , पुणे पूर्व महिला जिल्हा अध्यक्ष सुजाताताई ओव्हाळ आणि समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष उपाध्यक्ष व मेजर अँड अनिल कांबळे, मल्हारी लोंढे, नागसेन ओव्हाळ, अजय जाधव आणि सिनियर डी व्हि.ऑफिसर शुभांगी लोंढे , सैनिक दत्ता गायकवाड इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी चार जिल्हा च्या सैनिकांनी संचलन केले व त्यानंतर त्यांची प्रमोशन परेड आणि परीक्षा घेण्यात आली.
मेळाव्याचे सूत्रसंचालन पुणे पूर्व जिल्हा सरचिटणीस संतोष आरवडे यांनी केले, हा मेळावा यशस्वी करण्यासाठी पूर्व हवेली तालुक्याचे सुनील अवचार व विजय गायकवाड, नागसेन ओव्हाळ, रविंद्र कदम इत्यादींनी परिश्रम घेतले. या मेळाव्यास समता सैनिक दलाचे अधिकारी, सैनिक व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत