विरोधकांनी धर्म नीती केली त्यामुळे सत्तेत आले आहेत, त्याप्रमाणे आपणही धम्म नीती करावी लागेल

– डॉ. भीमराव य आंबेडकर
त्यावेळच्या डॉ भीमराव आंबेडकर यांनी दिलेले अधिकार व संविधान टिकविण्यासाठी आताचे डॉ भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊया
-अँड. एस के भंडारे
हरिद्वार,देहरादून (संघसेन यांचेकडून)- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची शेवटची क्रांती ही धम्म क्रांती आहे,भारत ही बुद्धाची जन्म भूमी आणि कर्म भूमी त्यांनी समता, शांतीचा धम्म दिला, तथागत बुद्ध काय आहे हे आम्ही 22राज्यात सांगतो आहोत त्यामुळे बौद्ध धम्माकडे ओढ वाढत आहे, धम्म एस सी, एस टी ओबीसी यांच्यापर्यंत घेऊन जावा लागेल. सम्राट अशोक यांना मानणारे जास्त ओबीसी आहेत त्यांना बौद्ध कडे आणावे लागेल. आमची संख्या वाढत आहे त्यामुळे जनगणना होत नाही. त्यांना भीती आहे त्याची संख्या कमी होत आहे म्हणून . त्यांनी धर्मांतर विरोधी कायदे करून
धर्मांतर करण्यावर निर्बंध आणले आहेत.सन 2014 पासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती दाबण्याचे काम होत असून प्रतिक्रांती सुरू आहे .
आंबेडकर समाजाला दाबण्याचे काम जोरात चालू आहे.उत्तर प्रदेश मध्ये राजनीती जास्त महत्व दिले,चार वेळा सत्ता आली पण व्यवस्थित काम केले नाही, त्यांनी धम्मला महत्व दिले नाही.पण विरोधकानी धर्म नीती केली आणि ते आता सत्ताधारी झाले आहेत त्याप्रमाणे आपणही धम्म नीती करावी लागेल तरच आपण सत्तेत येऊ शकतो असेडॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या हरिद्वार जिल्हा शाखेच्यावतीने दि.27/4/2025 रोजी फुटबॉल ग्राऊंड, सेक्टर एक, बी एच इ एल, हरिद्वार येथे आयोजित केलेल्या विशाल बौद्ध धम्म संमेलनात आपले परखड मत मांडले. डॉ भीमराव य आंबेडकर पुढे असे म्हणाले की,तुमचे प्रश्न सोडण्यासाठी दुसरे कोण येणार नाही, त्यासाठी तुम्हालाच काम करावे लागेल असे डॉ बाबासाहेब सांगून गेले आहेत याची आठवण करून देऊन, समाजात आंबेडकरी विचाराच्या अनेक संघटना आहेत पण त्यांनी उद्दिष्ट घेऊन गेले पाहिजे, त्यासाठी आजच्या परिस्थित एकत्र येणे गरजेचे आहे अनेक संघटनेत राहाल तर विरोधक तुम्हाला संपवतील. भारत भूभी ही आपली आहे त्यासाठी काम करावे असे आवाहन डॉ भीमराव य आंबेडकर यांनी केले.
यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर अँड एस के भंडारे यांनी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना व समाजाला झालेल्या विषमतेच्या त्रासाबद्दल बडोद्याला 24 सप्टेंबर रोजी संकल्प करून भारतीय संविधान लिहून अस्पृश्यता नष्ट केली, समता प्रस्थापित करून शैक्षणीक ,राजकीय, धार्मिक अधिकार दिले परंतु त्यावेळी विषमतेचे विरोधक यांनी या संविधानाला विरोध केला, त्यांनी त्यांना तीन आकडा अशुभ आहे म्हणून तिरंगा सन 2000पर्यंत फडकाविला नाही. या विचाराचे लोक आता सत्तेत आलेत त्यांना संविधान धर्माच्या आधारावरील म्हणजे विषमतेचे संविधान पाहिजे त्यासाठी 2019 च्या निवडणुकीत 400 के पार ची घोषणा केली होती परंतु संविधान समर्थक जनतेने ती यशस्वी होऊ दिली नाही . म्हणून आजच्या परिस्थीत संविधान समर्थक जोडो अभियान राबवून त्यावेळच्या डॉ. बाबासाहेब यांनी म्हणजेच डॉ भीमराव आंबेडकर यांनी दिलेले अधिकार, हक्क व संविधान वाचविण्यासाठी त्यांचे नातू म्हणजेच आताचे डॉ भीमराव (यशवंतराव )आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करावे. असे म्हणाले. अँड भंडारे पुढे असे म्हणाले की,त्यावेळी डॉ भीमराव (डॉ बाबासाहेब) आंबेडकर यांच्याबरोबर काम करता आले नाही आता त्यांच्या रक्ताच्या व विचाराच्या खऱ्या वारसदाराबरोबर डॉ भीमराव (यशवंतराव) आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊया.
नाहीतर , पूर्वीप्रमाणे पुढच्या पिढीच्या गळ्यात सांकेतिक मडके व कंबरेला झाडू असल्याशिवाय राहणार नाही.
तसेच या संमेलनामध्ये भंते विनय दत्त जी,राष्ट्रीय सचिव व उत्तराखंड प्रभारी वसंत पराड ,अँड मोहन राव, उत्तराखंड राज्य अध्यक्ष अँड राजेंद्र कुटीयाल, राम सजीवन यांनी मार्गदर्शन केले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी हरिद्वार जिल्हा शाखा अमित बौद्ध होते.या संमेलनात उत्तर प्रदेशचे राकेश भारती विविध संघटनाचे प्रतिनिधी व उत्तराखंड च्या विविध जिल्ह्यातून बौध्द जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते. संमेलन यशस्वी करण्यासाठी राम सजीवन, सीयाराम बौद्ध इत्यादींनी परिश्रम घेतले .
यापूर्वी दि.26/4/2025 रोजी देहरादून प्रेस क्लब, देहरादून मध्ये उत्तराखंड राज्य शाखा महामंत्री डॉ जितेंद्र सिंह बुटोईया यांनी लिहिलेले अद्वितीय सामंजस्य या पुस्तकाचे प्रकाशन आणि नुकत्याच आय ए एस परीक्षेत एकूण 1009 मध्ये 127 व्या क्रमाने पास झालेली सलोनी गौतम यांचा, त्याच्या वडिलाह सत्कार डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी भंते विनय दत्त जी,अँड एस के भंडारे, वसंत पराड, राजेंद्र कुटियाल, प्रो जयपाल सिंह, पूर्व न्यायाधीश चिरंजीलाल, आशा लाल इत्यादी विविध संघटनेच्या प्रतिनिधी च्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ भीमराव य आंबेडकर,अँड एस के भंडारे, वसंत पराड यांनी शुभेच्छा देऊन आपले विचार मांडले.सूत्रसंचालन लेखक डॉ जितेंद्र सिंह यांनी केले. या प्रकाशन सोहळ्यास अनेक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत