दिन विशेषदेशनोकरीविषयकभारतमहाराष्ट्रमुख्यपान

यूपीएससी परीक्षेत पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा

नवी दिल्ली, दि. २२-यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे. यूपीएससीच्या निकालासोबतच टॉपर्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. यावेळी प्रयागराज येथील शक्ती दुबेने परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे तर हर्षिता गोयलने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
यूपीएससीने २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. प्रयागराजची शक्ती दुबे ही

ऑल इंडिया टॉपर ठरली आहे. तर पुण्याचा अर्चित डोंगरे हा देशातून तिसरा आणि महाराष्ट्रातून पहिला आला आहे. एकूण १००९ उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत म्हणजे पहिल्या पाचमध्ये आलेल्या तीन महिला उमेदवार आहेत. आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि विविध गट ‘अ’ आणि गट ‘ब’ या केंद्रीय सेवांमध्ये नियुक्त्यांसाठी एकूण १,००९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
नागरी सेवा परीक्षा २०२४ अंतर्गत, यूपीएससीने आयएएस, आयपीएससह सेवांमध्ये ११३२ पदांसाठी अर्ज मागवले होते. पूर्वी मूळ अधिसूचनेतही फक्त १०५६ रिक्त जागा होत्या पण नंतर त्या ११३२ पर्यंत वाढवण्यात आल्या. त्यानंतर निकालात एकूण १००९ उमेदवारांना
यश मिळालं आहे. त्यापैकी ३३५ उमेदवार सामान्य श्रेणीतील आहेत. १०९ जण ईडब्ल्यूएस, ३१८ ओबीसी, १६० एससी आणि ८७ एसटी प्रवर्गातील आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे १५ दिवसांनी उमेदवारांचे गुण जाहीर केले जातील. १७ एप्रिल २०२५ पर्यंत युपीएससी परीक्षेच्या मुलाखती सुरु होत्या. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या सुमारे २८४५ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!