दहीगाव तेल्हारा येथे पंचशील ध्वज विटंबना

दहीगाव तेल्हारा येथील पंचशील ध्वज विटंबना करून दंगल घडवण्याचा प्रयत्न मात्र पोलिस राजकीय दबावात बौद्धांना टार्गेट करीत आहेत.
अन्यथा पोलिसा विरुद्ध रस्त्यावर उतरणार या राजेंद्र पातोडे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे दिवशी दहीगाव येथील प्रवेश कमानी वर लावलेला पंचशील ध्वज आणि निळे ध्वज तोडल्या मुळे तणाव निर्माण झाला होता.हा दंगल घडवण्याचा प्रयत्न होता.अशा वेळी दहिगाव फाट्यावर तेथील नागरिक रात्रभर फाट्यावर आंदोलन करीत होते.पोलिसांनी दि. १६.०४.२०२५ रोजी बौद्ध समाजाचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन तेल्हारा येथे अप. क. १०६/२०२५ बि.एन.एस. कलम २९९ गुन्हा दाखल केला होता.पोलिस राजकीय दबावात योग्य कलम लावत नव्हते.केवळ धार्मिक भावना दुखावली म्हणून गुन्हे दाखल केले होते.मुळात दंगल घडवण्याचा कट रचण्याचा कलम लावणे गरजेचे होते.पुन्हा आंदोलन आणि पोलिस अधिकारी यांना बोलून त्यांनी ३ (१) (r) (s) ३ (२) (va) ३ (१) (t) अ.जा.ज.अ.प्र. कायदा सुधारणा अधिनियम सन २०१५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
अट्रॉसिटीचे कलम लावतच बौद्ध तरुणा विरुद्ध काउंटर केसेस लावण्यात आल्यात.
काल दिनांक १७.०४.२०२५ रोजी दहीगाव ता. तेल्हारा येथील महिलांना पुढे करून दाखल फिर्यादवरुन अप.क्र.१०८/२०२५ कलम २९९, ७४, ७६, ३३३, ३५२, ३५१ (२), ३०९ (४), ७९, १८९ (२), १९१ (२), १९०, ३२४ (४) बी.एन. एस. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.बौद्ध तरुणावर राजकीय दबावात तब्बल १२ कलम लावून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एवढेच नव्हे तर पोलिसांनी आज सकाळ पासून गावात कॉम्बिंग सुरू केले होते.गावचे सरपंच आणि पोलिस पाटील ह्यांना सोबत घेऊन पोलिस, महिला पोलिस आणि शीघ्र कृती दलाचे जवान बौद्ध वस्तीत जाऊन मिळेल त्याला ताब्यात घेत होते.राजकीय व्यक्ती सोबत घेऊन पोलिस बौद्ध वस्तीत दहशत पसरली पाहिजे अशा पद्धतीने वागत आहेत.
तेल्हारा ठाणेदार उलेमाले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल हे एकतर्फी कार्यवाही करत आहेत.पोलिस राजकीय दबावात जर कायदा धाब्यावर बसवून जाणीवपूर्वक बौद्ध समाजाला लक्ष्य करीत आहेत.हे थांबले नाही तर वंचित बहुजन आघाडी लवकरच तेल्हारा पोलिसाचे विरुद्ध रस्त्यावर उतरून जाब विचारला जाईल.
पोलिसांनी परभणी सारखे वातावरण निर्माण करून बौद्ध समाजात दहशत निर्माण केली जात आहे.ह्या बाबत आज वंचित युवा आघाडी तालुका पदाधिकारी ह्यांनी गावात जावून पाहणी केली.तसेच ठाणेदार उलेमाले यांच्या सोबत बोलून दिले.चुकीचे पद्धतीने पोलिसांनी सुरू केलेली कार्यवाही बंद करण्याची सूचना ह्या वेळी ठाणेदार यांना दिली आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
9422160101
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत