निवडणुकांच्या तारखा जवळ जवळ निश्चित. सर्वच राजकीय पक्ष लागले कामाला..!

आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता साधारण १४ मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने येत्या काळात सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने कामाला लागले आहेत.
येत्या काळात सरकारकडून सुद्धा विविध निर्णयांचा धुमधडाका लावण्यात येणार आहे. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने येत्या आठवड्यात दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकीत मोठ्या निर्णयांची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याशिवाय येत्या काळात अनेक विभागांकडून विविध शासन निर्णयही जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत