
३१ मार्च १९९० भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना “भारतरत्न” हा सर्वोच्च किताब घोषित केला. भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारत सरकारनं आजच्याच दिवशी भारतरत्न पुरस्कार जाहीर केला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर 33 वर्षांनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. तो दिवस 31 मार्च 1990 होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर सामाजिक समतेसाठी केलेल्या संघर्षाची दखल घेत त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी भारतरत्न देण्यात आला.
31 मार्च 1990 ला मरणोत्तर भारतरत्न जाहीर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर तब्बल 33 वर्षांनी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या सरकारनं हा पुरस्कार देण्याचं 31 मार्च 1990 घोषित केलं. 14 एप्रिल 1990 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमन यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सविता आंबेडकर यांनी भारतरत्न पुरस्कार स्वीकारला.
━━━━━━━━༺۵༻━━━━━━━━
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
जय भिम ✺ नमो बुद्धाय
जय संविधान
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत