दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

निळी टोपी व निळ्या दुपटयाचा दुरुपयोग


मानवाला पशुपेक्षाही हीन दर्जाची वागणूक दिली जात असे त्या समाजात परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जन जागृतीची मशाल प्रज्वलीत केली अंधार्या युगात जगणाऱ्याना उजेडात आल्यावर आपल्या अस्तीत्वाची जाणिव झाली. परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संघटित होऊन आपल्या अधिकारासाठी संघर्ष करू लागला.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आदेश अत्यंत मोल्यवान असून जीव गेला तरी चालेल परंतु आदेशाची अवहेलना होता कामा नये.
संघटन शक्तीचा प्रभाव पडून प्रस्थापित व्यवस्था बेचैन झाली.
बाबासाहेब आंबेडकरांच्या सघठनेत निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज तयार झाली. जातीयवादी हल्ल्यांना तोंड देऊ लागले. जे लोग महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात काम करीत होते त्यांना हरिजन म्हटल्या जात होते. त्यांच्या सोबत रोटी बेटी व्यवहार नव्हता. हरिजन लोक आंबेडकरी मोहल्यात जाण्यास घाबरत असत. मोहल्यात राहणारे लोक सुद्धा सरळ रस्त्याने जात नव्हते तर मागील गावच्या बाहेरील रस्त्याने जात असत.येवढा धाक आंबेडकरी चळवळीचा होता.
सत्तेच्या माध्यमातून अनेक प्रलोभन कार्यकर्त्यांना आले परंतु त्यांचा कोणताही परिणाम झाला नाही.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवंत असे पर्यंत संघटनेवर काही परिणाम झाला नाही.जे कोणी विरोधी संघटनेच्या सोबत दोस्ती करीत असत. त्यास हरिजन समजत असत त्यांना समाजातून बहिष्कृत करीत असत.

येथील वैदिक व्यवस्था विरोधाची नाळ मजबूत होत होती.
त्यामुळे व्यवस्था घाबरली होती.ही घोडदौड थांबली पाहिजे ह्यासाठी डावपेच आखत होते परंतु बाबासाहेबापुढे हतबल होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानतर त्या तोडीचा नेता नसल्यामुळे संभ्रम अवस्था निर्माण झाली.
ज्या पक्षांचा विरोधी पक्ष म्हणून ओळख होती.ती बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर दादासाहेब गायकवाड यांच्यावर विश्वास होता त्यांनीच सत्ताधारी पक्षा सोबत युती केली व सत्तेची फळे चाखण्याची कार्यकर्त्यांना सवय लागली.
कर्मवीर हरिदास आवळे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अँड बीसी कांबळे दादासाहेब रूपवते नरेन्द्र कांबळे एल आर बाली आदि आंबेडकर वादी नेत्यांनी काँग्रेस रिपब्लिकन युतीला विरोध केला. काँग्रेस विरोधी भूमीका मांडून रिपब्लिकन विचारधारेचा प्रचार व प्रसार केला. सत्तेच्या काँग्रेस विरोधी रिपब्लीकन पक्ष हीभुमीका घेऊन संघर्ष केला.
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांची सुवर्ण जयंती वर्ष साजरा केल्या जात आहे. परंतु ज्यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या विरोधि संघर्ष केला तेच कार्यकर्ते जबाबदारीने स्विकारताना दिसत आहे. सच्चे राजाभाऊ खोब्रागडे यांचे कार्यकर्ते दूर फेकल्या गेले.
निळी टोपी व निळ्या दुपट्टा कोणत्याही विचारांच्या कार्यकर्त्यांनी परिधान करावे.व आम्ही आंबेडकरी असल्याचा भास करावा. हे प्रचालीत झाले आहेत
भाजपा असो किंवा काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कम्युनिस्ट ह्याची आंबेडकरी शक्तीवर नजर असते.
भोळ्या आंबेडकरी जनतेला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न असतो.हया पासून सावध असावे व नकली आंबेडकरी पासून दूर राहावे.
विनायकराव जामगडे
९३७२४५६३८९
७८२३०९३५५६

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!