मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

नळदुर्ग शहरात ढकली हॉलीबॉल स्पर्धेने मैदान गाजले

मा राणादादा आमदार चषकावर कोणत्या संघाचे नाव कोरणार

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

नळदुर्ग शहरात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय नेते तथा युवकांचे प्रेरणास्थान सुनिल मालक चव्हाण यांच्या वाढदिवसा निमीत्ताने मित्र परिवाराच्या पुढाकाराने या व्हालीबॉल स्पर्धेचे
उद्घाटन भाजपाचे धिमाजी घुगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नळदुर्ग नगरीचे माजी नगरसेवक सुधिर भैया हजारे , विनायक अहंकारी , शिवसेनेचे शिंदे गट धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , भाजपाचे पद्माकर घोडके , भाजपाचे नेते श्रमिक पोतदार ,
पत्रकार दादासाहेब बनसोडे आदिजनाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले .
या स्पर्धेचे आयोजन संदीप दिलीप गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले वैभव व्यंकटराव पाटील, अजय दत्तात्रय दासकर , प्रविण अमृता चव्हाण यांनी केले आसुन
उद्घाटनप्रसंगी दोन्ही टीमला एकत्र घेऊन ज्ञानेश्वर घोडके यांनी टॉच केली आणि दोन्ही टीमना शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले तर शेवटी आभार प्रसन्न कदम यांनी केले . या स्पर्धेत एकुण १५ संघानी सहभाग नोंदविला आता कोण नाव कोरणार या राणादादा आमदार चषकावर हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे .
यावेळी बबलू कौरव , दिग्विजय भोसले यांची महाराष्ट्र टीम मध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे ही स्पर्धाचे आयोजक संदिप गायकवाड , वैभव पाटील , प्रविण चव्हाण , प्रसन्न कदम , अजय दासकर शुभम महाबोले आदिनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!