कायदे विषयकदिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

असं झालं तर लोकशाहीच पोरकी होईल!

समाज माध्यमातून साभार

कारण
जज साहेबांच्या घरात
फक्त नोटा जळत नव्हत्या
तर जळत होता

न्यायव्यवस्थेवरचा विश्वास!

.
.
.
मागे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी
कॉंग्रेस पक्षावर कारवाई होते.
त्यांची बँक खाती गोठवण्यात येतात.
समोर निवडणुका. बँकेत पैसे.
पण खर्च करता येत नाही.
मग ते न्यायालयात जातात.
आपल्याला न्याय मिळेल.
न्यायालय लोकशाही वाचवतील.
अशी भोळी आशा.
पण न्यायमूर्ती अतिशय कडक.
सरळ सांगतात, कारवाई योग्य.
याचिका बरखास्त करतात.
कॉंग्रेस पक्ष अडचणीत येतो.
ते अतिशय कठोर आणि शिस्तप्रिय
असे न्यायाधीश असतात
न्या. यशवंत वर्मा.

दिल्ली उच्च न्यायालय.

तसं पाहिलं तर
त्यांचेही ‘अच्छे दिन’ सुरु होतात
२०१४ नंतरच.
आधी ते अलाहाबाद हाय कोर्टात
अतिरिक्त न्यायाधीश बनतात.
२०२१ मध्ये दिल्ली हाय कोर्टात

न्यायाधीश म्हणून नियुक्ती.

कार्पोरेटचा आणि आर्थिक व्यवहाराचा
त्यांचा विशेष अभ्यास असतो.
असं म्हणतात की एकेकाळी
सिम्भावली शुगर लिमिटेड
या कंपनीचे ते संचालक होते.
या कंपनीने ९०० कोटी रुपयांचा
घोटाळा केला होता.
पण त्यातून ते सहीसलामत सुटले.

पुढे हाय कोर्टाचे जज झाले.

त्यांच्यासमोर अनेक कार्पोरेट विवाद
असलेले खटले येत असतात.
स्पाइसजेट आणि मारन
यांचा ५७९ कोटी रुपयांचा वाद.
याशिवाय पेपैल ची मनी लॉन्डरिंग केस.
दिल्ली सरकारची शराब अबकारी केस.
थोडक्यात अनेक मालदार खटले.

अतिशय कडक न्यायाधीश म्हणून त्यांची ख्याती.

तर होतं असं
हे जज साहेब गावाला जातात.
तारीख असते १४ मार्च.
सर्वत्र होळी पेटवली जात असते.
आणि त्यांच्या दिल्ली येथील
सरकारी घरालाच आग लागते.
नोकर चाकर फायर ब्रिगेडला बोलावतात.
आग विझवता विझवता त्यांच्या लक्षात येतं
की पोत्यांमध्ये भरलेल्या
कोट्यावधी रुपयांचा नोटा जळत आहेत.
पोलिसांना कळवलं जातं.
गुपचूप मोबाइलवर व्हिडीओ काढले जातात.
ती व्हिडीओ क्लिप सुप्रीम कोर्टाच्या
मुख्य न्यायमूर्तींना पाठवण्यात येते.

सगळं गुपचूप चालू असतं.

आठवडाभर कुणीतरी हे प्रकरण
दाबायचा प्रयत्न करत असतं.
पण आठवड्यानंतर म्हणजे २१ मार्चला
‘टाइम्स ऑफ इंडिया’त बातमी येते.
आणि सर्वत्र सुनामी आल्यासारखं होतं.
कुणी सांगतो, १५ कोटी होते
दुसरा पत्रकार म्हणतो ५० कोटी होते
हिशोब शेकडो कोटी रुपयांचा सुरु होतो

सोशल मिडीयावर धुमाकूळ सुरु होते.

तोपर्यंत जज साहेब कुणाला तरी सांगून
ती स्टोअर रूम साफ करून टाकतात.
नोटांचे अवशेष राहत नाही.
‘आम्हाला काहीच माहिती नाही’,
‘कुणीतरी आम्हाला फसवत आहे’,
‘ते पैसे आमचे नाही’
‘माझ्या विरोधात एक षडयंत्र होत आहे’
असे अनेक स्टेटमेंट
जज साहेब देऊ लागतात.
पण कुणीतरी खंबीर माणूस
त्यांच्या सोबत आहे,
स्पष्टपणे हे दिसू लागतं.
पीटीआय तर्फे फायर ब्रिगेड च्या प्रमुखाचे
स्टेटमेंट समोर येते,
‘आम्हाला नोटा मिळाल्याच नाही.’
पण गोंधळ वाढत जातो.
न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडू लागतो.
त्यात मोदी सरकारच्या जवळचे वकील
टीव्हीवर येऊन

वेगळीच बडबड करू लागतात.

शेवटी सुप्रीम कोर्ट
एक समिती स्थापन करतो.
तपास सुरु केला जातो.
कुठलीही केस त्यांच्यासमोर
सुनावणीसाठी येणार नाही,
हे ठरवलं जातं.
सर्व माहिती सुप्रीम कोर्टाच्या
वेबसाईटवर टाकली जाते.
त्यामध्ये नोटा जळत असल्याची
ती व्हिडीओ क्लिप पण असते.
सगळं काही स्वच्छ, पारदर्शी कारभार आहे
हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.
पण नेमके किती पैसे होते,

हे आतापर्यंत तरी जाहीर होत नाही.

एकीकडे मोदी साहेबांची
‘न खाउंगा न खाने दुंगा’ ची डरकाळी
आणि दुसरीकडे छोट्या मोठ्या रकमेसाठी सुद्धा
अतिशय आक्रमक झालेल्या
इडी, सीबीआय, इन्कमटॅक्स अशा संस्था.
त्यामुळे कुठलाही अधिकारी असो, नेता असो
भ्रष्टाचाराचा पैसा घरात ठेवताना

शंभर वेळा विचार करणार, हे नक्की.

पण याचा परिणाम फक्त विरोधी पक्षांच्या
नेत्यांवरच जास्त होताना दिसतो.
तुम्ही जर सत्ताधाऱ्यासोबत असाल तर
‘नो प्रॉब्लेम’!
जर विरोधी पक्षात असाल तर
पटकन सत्ताधारी पक्षाच्या सोबत जा
आणि भ्रष्टाचार करण्याचे लायसन्स मिळवा,
अशी परिस्थिती.
त्यामुळे तुरुंगात जाणारे अनेक इडीग्रस्त नेते
सत्ताधाऱ्यांकडे जाऊ लागतात
मंत्री-संत्री बनतात.
‘न खाउंगा न खाने दुंगा’
या वाक्याची विटंबना सुरु करतात.
कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा

सर्रास वापरतात.

किमान या घटनेचा तपास व्यवस्थित व्हावा.
गुन्हेगाराला शिक्षा मिळावी.
लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास
कायम राहावा, ही अपेक्षा.
कारण इडी, सीबीआय, इन्कमटॅक्स, पोलीस,
प्रशासन, निवडणूक आयोग अशा कितीतरी संस्था
लोकांच्या मनात संशय निर्माण करत आहेत.
संपूर्ण व्यवस्थेवरचा विश्वास
पूर्णपणे उडालेला असला तरी
लोक अजूनही न्यायव्यवस्थेवर
विश्वास ठेवून आहेत.
तोही उडाला तर
लोकशाहीच पोरकी होईल.
कारण जज साहेबांच्या घरात हे
फक्त नोटा जळत नव्हत्या
तर जळत होता
न्यायव्यवस्थेवरचा विश्वास !!!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!