देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

वारेमाप अनिश्चितता : डोनाल्ड ट्रम्प यांचे दुसरे नाव !

॥आर्थिक अभ्यासवर्ग॥

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक आणि व्यापारी धोरणांमधील धरसोडीमुळे सर्वच जगात जर काही एक गोष्ट वेगाने पसरत असेल तर ती आहे , अनिश्चितता !

वर्षाने जाऊ द्या , पुढच्या महिन्यात काय चित्र असेल याबद्दल अंदाज बांधायला कोणी तयार नाहीत !

ही अनिश्चितता फक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणातील धरसोडी मुळेच येत नाहीये. तर ट्रम्प यांच्या धोरणांचा विपरीत परिणाम ज्या देशांवर उदा युरोप, चीन इत्यादी होणार आहे ते देश , सतत अंदाज घेत आहेत. नक्की कोणती धोरणे आखून प्रतिसाद द्यायचा यांवर खलबते करत आहेत. याबद्दलही अनिश्चितता आहे, आणि ते समजण्यासारखे आहे.


         अमेरिकेत प्रत्येक अमूर्त गोष्टीचे निर्देशांक (इंडेक्स) काढले जातात. तसाच “आर्थिक धोरणे अनिश्चितता निर्देशांक” (इकॉनॉमिक पॉलिसी अनसरटंटी इंडेक्स) काढला जातो. ‘हा नंबर जेव्हढा जास्त तेवढी अनिश्चितता जास्त’ असा त्याचा अन्वयार्थ लावला जातो. 

      ऑक्टोबर २०२४ मध्ये हा ‘अनसरटंटी इंडेक्स’ १०९ होता , फेब्रुवारी २०२५ मध्ये तो तब्बल ४६० झाला आहे ! 

         जगभर कोरोनाची महासाथ पसरायला लागल्यानंतर मे २०२० मध्ये तो ५०४ होता ! 

       २००८ मधील जागतिक अरिष्टात देखील तो एवढा नव्हता. 

यावरून सध्याच्या अनिश्चिततेची कल्पना येईल.


         गुंतवणूकदारांचे दोन प्रकार असतात. एक नवीन कारखाना उभारण्यासाठी घातलेले भांडवल, कॅपिटल एक्सपेंडिचर ; आणि दुसरा फायनान्शियल ऍसेट मार्केटमध्ये म्हणजे सेकंडरी मार्केटमध्ये केली जाणारी खरेदी विक्री. 

        या दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांना शासनाची आर्थिक धोरणे भांडवल_स्नेही  किंवा व्यवसाय_स्नेही असावीत , असे वाटणे स्वाभाविक आहे. समजा ती तशी नसतील तर गुंतवणूकदार आपल्या प्लॅनिंग मध्ये या जोखीमा गृहीत धरतात. 

      पण जोखीम नक्की कोणत्या असतील, याबद्दलच संधीग्धता असेल तर फायनान्शिअल प्लॅनिंग तरी काय करणार ? गुंतवणूकदारांसाठी सर्वात नर्व्हस करणारी गोष्ट असते अनिश्चितता. या अनुभवातून आज जगभरातले गुंतवणूकदार जात आहेत. 

यातून दोन गोष्टी होणार आहेत.

१. नवीन उद्योग धंद्यातील गुंतवणुकी / कॅपिटल एक्सपेंडिचर अमर्याद काळ पुढे ढकलल्या जातील.

२. फायनान्शिअल ऍसेट मार्केट (शेअर्स, रोखे इत्यादी) वादळे असतील.

        हे किती गंभीर स्वरूप धारण करेल हे काळच ठरवेल. पण ते सर्व भारतावर देखील येऊन आदळणार हे नक्की. परकीय गुंतवणुकी कमी होतील , डॉलर रुपया विनिमय दर वादळी असेल इत्यादी !!

संजीव चांदोरकर (१७ फेब्रुवारी २०२५)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!