जातीयवादी विद्यापीठ प्रशासनाचा जाहीर निषेध…

एका दलित प्राध्यापिकेला अपमानजनक वागणूक देऊन त्यांच्या सोबत सामुदायिकपणे गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.
दिनांक ४ मार्च २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय आहे. विद्यापीठाच्या मुख्य वसतीगृहप्रमुख पदावर काम करणाऱ्या प्रा. डॉ. वर्षा वानखेडे यांच्यासोबत त्यांच्या कार्यालयात घुसून विद्यापीठाच्या काही कर्मचार्यांनी सुरक्षा रक्षकांच्या उपस्थित राजीनामा देणे संबंधित दबाव टाकला व त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यांच्यासोबत झालेल्या या गैरव्यवहाराची सविस्तर लेखी तक्रार मा. कुलगुरू यांना संबंधित प्राध्यापिकेनी केली आहे. गेल्या वर्षभरामध्ये विद्यापीठात जाणीवपूर्वक दलित , आदिवासी , अल्पसंख्याक व बहुजन विद्यार्थी, कर्मचारी व प्राध्यापकांना इ. ना लक्ष केल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. विद्यापीठांमधील मनुवादी व जातीयवादी वरिष्ठ अधिकारी काही संघटना, संघटना प्रतिनिधी, पीएचडी संशोधक विद्यार्थी इ. ना हाताशी धरून जातीय तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र सातत्याने करत आहेत. राजीनामा घेण्याची ही कोणती पद्धत नव्याने प्रभारी कुलसचिव यांनी सुरू केली आहे ? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ? स्वतः अपात्र व अकार्यक्षम आणि अजून त्यामध्ये भर म्हणजे प्रभारी असताना त्यांना अशा पद्धतीने इतरांना बदली करण्याचा व चार्ज देण्याचा अधिकार आहे का ?
संबंधित प्राध्यापिकेने लिहिलेल्या पाच पानाच्या दीर्घ पत्रामधून हा सर्व घटनाक्रम कुलगुरूंना लेखी स्वरूपात कळवला आहे. *आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते , कार्यकर्ते , लेखक , विचारवंत व प्राध्यापक यांना माझी विनंती आहे की , आपण या पत्राची गंभीर दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाला नक्की प्रश्न विचारावेत*. या पत्रामधील काही गंभीर वाक्य या ठिकाणी मी देत आहे ते तुम्ही खाली सविस्तर वाचणार आहातच.
घटना प्रसंग १)
एक कर्मचारी माझ्या वाटेमध्ये आल्यामुळे संबंधित व्यक्तीचा मला स्पर्श झाला/ धक्का लागला जे की ते अतिशय मानहानीकारक, अपमानकारक व संतापजनक होते.
घटना प्रसंग २)
काही दिवसापूर्वी मुलांसाठीच्या नवीन वस्तीगृहाच्या भूमिपूजनासाठी केलेल्या शिलालेखांमधून मुख्य वस्तीगृहप्रमुख यांचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आले.
तसेच प्राणीगृहाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये योगदान असताना देखील त्या ठिकाणी देखील नावाचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळाल गेला.
अशा अनेक अपमानास्पद प्रसंगाचा वारंवार सामना त्यांना करावा लागला आहे. प्राणीशास्त्र सारख्या विषयांमध्ये 29 वर्ष अध्यापन करण्याचा अनुभव असणाऱ्या एका भगिनीला केवळ दलित असल्यामुळे अशा पद्धतीची वागणूक दिली जात आहे. हे खरंच खूप भयानक आहे. हा अन्याय होत असतानाच काही विद्यार्थ्यांना हाताशी धरून खोटेनाटे आरोप देखील काही व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या सांगण्यावरून करण्याचे षडयंत्र देखील सुरू आहे.
विद्यापीठ प्रशासनाला आम्ही इशारा देत आहोत की , जर संबंधित प्राध्यापिकेच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये ज्या ज्या व्यक्तींचा नामउल्लेख केलेला आहे त्या सर्व व्यक्तींसोबत प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू हे तसेच इतर सर्व लोक त्यास जबाबदार राहतील.
टिप – आंबेडकर हे चळवळीतील सर्व नेते व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या पद्धतीने विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारायचा आहे. मी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक दिले आहे त्यावरती फोन अथवा लेखीपत्र व्यवहार करून आपण आपला विरोध दर्शवू शकतो.
१) कुलगुरू – 99224 97839
२) प्रभारी कुलसचिव – 75077 79166
पिडीत प्राध्यापिकेचा संपर्क क्रमांक – 7040648545
जय भीम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय संविधान
- राहुल ससाणे ( *आंबेडकरी कार्यकर्ता* )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत