बौद्ध धम्माच्या प्रभावातूनच शिवशाही पासून लोकशाही पर्यंतचा प्रवास :- प्रबुद्ध साठे

पंढरपूर:- २१ व्या शतकातील लोकशाहीचे मूल्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाही काळात लोकाभिमुख होती, भगवान बुद्धांचे बोट धरूनच शिवशाही पासुन लोकशाही पर्यंतचा प्रवास झाला, बौद्ध धम्माच्या प्रभावातूनच शिवशाही पासुन लोकशाही पर्यंतचा प्रवास हा खरा इतिहास असून छत्रपती शिवाजी महाराज हे बौद्ध राजे होते असे प्रतिपादन चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियान प्रमुख व विश्व बौद्ध परिषदचे संस्थापक अध्यक्ष प्रबुद्ध साठे यांनी केले ते बामसेफ पंढरपूर सोलापूर जिल्हा युनिट आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त व भारतीय संविधान अमृत महोत्सव निमित्त आयोजित शिवशाही पासुन लोकशाही पर्यंतचा प्रवास या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष बामसेफ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन भंडारे गुरूजी होते, , प्रबुद्ध साठे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, अस्पृश्यता व जातीव्यवस्था मोडून छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजक्रांतून राज्यकांती केली 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफजलखान लढाईच्या वेळी कृष्णा कुलकर्णीला ठार मारून मनुस्मृती जाळली तसेच रांझ्याच्या पाटलाची हातपाय तोडण्याची शिक्षा देवून शिवरायांनी अट्रासिटी अक्ट ची अंमलबजावणी केली, म्हणूनच शिवचरित्रातून उर्जा घेऊन सम्राट अशोक व छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व डोळ्यासमोर होते म्हणून संविधान लिहताना मला थकवा आला नाही असे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते व त्यांनी बौद्ध धम्माचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भारतीय संविधानाची निर्मिती करुन लोकशाही भारत उभा केला याप्रसंगी बामसेफ राज्य प्रवक्ते सुनील आडगळे यांचे ही प्रासंगिक भाषण झाले, यावेळी विठ्ठल कांबळे सर, राजू वाघमारे गुरूजी, धनाजी आडगळे, प्राचार्य राजेंद्र पाराध्ये, भाऊ कांबळे, शशिकांत कांबळे, हारचंद पावरा, नामदेव सरवदे, लक्ष्मण बंगाळे, महसूल सुक्षा अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल शीलरत्नसले (भाळवणी) तसेच मदतड अभियंता अनुराधा कसबे (खरसोळी) यांचा सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष दतात्रय कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष जालिंदर गायकवाड यांनी केले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत