
लासलगाव- नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ‘माझी मराठी स्वाक्षरी!’ हा अभिनव उपक्रम आयोजित केला होता. संस्थेचे सरचिटणीस मा. गोविंदराव होळकर यांचे हस्ते ह्यांच्या हस्ते सदर उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्गाने मराठी स्वाक्षरी करून आपले माय मराठीबद्दलचे आपले प्रेम, आदरभाव व्यक्त केला. महाविद्यालयातील दर्शनी भागात मांडणी केलेल्या फलकावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कल्पक सृजनातून आपापल्या मराठी स्वाक्षरी साकारल्या. महाविद्यालयातील सर्वच विद्याशाखांमधील विद्यार्थ्यांनी ह्या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला. ह्या उपक्रमाचे आयोजन मराठी विभागातील डॉ.प्रतिभा जाधव यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. प्रा. अनिल डंबाळे , प्रा. प्रांजली ढेरे यांनी यासाठी सहकार्य केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत