काषाय फिनिक्स: आंबेडकरवादी साहित्य लेणी

कवी पुरुषोत्तम संबोधी यांचा काषाय फिनिक्स हा कवितासंग्रह फार आवडला. काषाय फिनिक्स हे नाव फार प्रेरणादायी. आंबेडकरी चळवळीला गतिमान करणारी प्रत्येक कविता .
वर्तमानाला प्रश्न विचारते. जगण्याचे बळ देते. माणसाचे महान पण सिद्ध करणारी सिद्धार्थ कविता आहे फिनिक्स ही ग्रीक संकल्पना आहे .
फिनिक्स पक्षी कोणी पाहिला. राखेतून जन्माला येणारा हा फिनिक्स पक्षी संकल्पना आहे .प्रतीक म्हणून आंबेडकरी चळवळीला अत्यंत जवळचे आहे.
हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्याचे, समतेचे, न्यायाचे, बंधू भावाचे स्वप्न पूर्ण करणारा फिनिक्स पक्षी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत.
मुखपृष्ठावर काषाय फिनिक्स पिवळा पक्षी ( गरुड )आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे रुबाबदार फोटो पाहून पुस्तक हवे हवेसे वाटते. वाचावेसे वाटते .
आंबेडकरी चळवळीचे काही टप्पे आहेत.
विद्रोह पहिला टप्पा.
नकार दुसरा टप्पा.
भारतीय संविधान तिसरा टप्पा .
धम्मक्रांती चौथा टप्पा .
भारतीय संविधान आमचे जीवन गीत आहे .
आरक्षण (हक्क )घेऊन सत्तेत सहभाग आम्ही घेतला.
हे युगप्रवर्तक कार्य समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ ,
विधी तज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले .
पुरुषोत्तम संबोधी हे नाव आंबेडकरी आंदोलनाला विश्ववैभव प्राप्त करून देणारे आहे.
पुरुषोत्तम संबोधी कवी आहेत. लेखक आहेत. विचारवंत आहेत. दृष्टी आहे .आंबेडकर विचारधारा आहे. सृजनशील व्यक्तिमत्त्व आहे. चळवळीतून पुढे आलेले आहे. मनाचा जेव्हा कोंडमारा झाला. तेव्हा नाकेबंदी केली. कवितेचा जन्म देऊन आंबेडकरी आकाशात भरारी घेतली.
दीक्षाभूमीशी त्यांचं नातं आहे . क्रांतिभूमीत जीवन प्रवाह व्यक्त करीत ,शब्दांची शिदोरी घेऊन ,कविता चळवळीचा कणा झाली. नागफणा झाली.
कवी नामदेव ढसाळ यांचा प्रभाव त्यांच्या कवी मनावर आहे .कवितेवर आहे. नामदेव ढसाळ यांची गोलपीठा आमच्या मनावर राज करत आहे. ही पिढी पहिली आहे. आम्ही नामदेव ढसाळ पाहिला ,वाचला ,ऐकला ,मोर्चात सहभागी झालो .त्यांनी नेतृत्व केले. तो काळ चळवळीचा, आंदोलनाचा होता. लढण्याचा होता. महाविद्यालय आणि विद्यापीठात शिक्षण घेताना नामदेव ढसाळ यांची कविता विद्यार्थी घरात, वाचनालयात ,चौकात, सभा संमेलनात बिनधास्त वाचत होते . मी वाचत होतो . ती चळवळीची कविता झाली. गोलपिठा घरात आली.
पुरुषोत्तम संबोधी यांनी नामवंत कवी केतन पिंपळापुरे यांना काषाय फिनिक्स हा कवितासंग्रह हृदयपूर्वक समर्पण केला .
आमची प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सांगितले. समता सैनिकाचे कार्य आणि कर्तुत्व मला मान्य आहे. त्यांनाही ते मान्य आहे. मार्शल एडवोकेट विमलसुर्य चिमणकर, प्रा.जयंत शेंडे यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते कवी आहेत . ही अभिमानाची बाब आहे .
माननीय कवी ज.वि. पवार यांनी प्रस्तावना लिहून संघर्ष उत्सवात सहभाग दिला. ते म्हणतात काषाय फिनिक्स चळवळीचे ऊर्जा स्त्रोत्र आहे.
संबोधी यांची कविता समतेचा श्वास, न्यायाचा घास, स्वातंत्र्याचा जाहीरनामा देते .मैत्रीच्या सागराला आलिंगन देते .निती हाच धम्म सांगते. बुद्ध फुले शाहू आंबेडकर मनामनात पेरते.
राजा ढाले आमचे युगसेनापती. त्यांना पाहिले, ऐकले, वाचले, सम्यक क्रांतीचा नारा त्यांनी दिला .भुलभुलय्या नष्ट केली .अनेकांची खोटी राजवस्त्रे फाढली
आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य दिले. राजा ढाले चळवळ जगले .समतेने वागले .आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी झाले. पॅंथर पुढे नेली . न्यायासाठी अखंड लढा राजा ढाले यांनी दिला.पुढे पॅंथर फुटली हा भाग वेगळा. बुद्धांचा विचार, आचार आणि संस्कार आजन्म सांगितले. संघर्षाचे नाव राजा झाले.
पुरुषोत्तम संबोधी यांनी राजा ढाले,नामदेव ढसाळ यांच्यावर कविता लिहून कवितेला राजमहालाचा रस्ता दाखविला . संविधानाचा संघर्ष संस्कार नटविला.
कालही आजही समता विरुद्ध विषमता लढा कायम. पुरोगामी म्हणणारे प्रतिगामी झाले .
काल एका जीवनाला उध्वस्त करून आले.
कवी पुरुषोत्तम संबोधी म्हणतात
“आमच्या गावात सूर्याला येऊच दिले नाही”
“हा कल्याण मार्ग रोहिणीच्या युद्ध पर्वत दिसला “
“तिकडे रशिया युक्रेन इकडे कुकी मैत्रेयी “
“युद्धपर्वात बुद्ध सूर्याची गरज आहे “
“सूर्याचाही महासुर्य तू रामजी नंदना”
“बाबासाहेब आणि मॅझिनी “
“बाबासाहेब आणि:दिलीप कुमार”
“वाशिंग्टन आणि बाबासाहेब “
“रमाई आणि यशोधरा”
“बडोद्याच्या बागेतील अश्रू “
या कविता वाचनीय आणि चिंतनशील आहेत !
जय भीम ऐवजी जय मूलनिवासी ,जय कार्ल मार्क्स,
जय बिरसा मुंडा हा फसवणारा नारा आहे.
हे संबोधी प्रामुख्याने सांगतात.
“क्रांतीचे पंख छाटतो “ही खंत कवींनी व्यक्त केली.
“धर्म आहे एक मोठा जेल
त्यातील प्रत्येक जात एक अंडासेल “
(जेल आणि अंडासेल )
मेत्ता भावना ,आम्ही चालतो तेव्हा , चळवळीतील बाणेदार कविता.आणि ज्वलंत जिवंत कविता .
मनूचा पुतळा, धर्मसंसद लोकसंसद ,गुलामीचे राजसूत्र सांगणाऱ्या कविता.
क्रांती आणि प्रतिक्रांती योग्य संवेदना.
रोहित वेमुला न्याय कविता.
बैल कवितेत माणसांना गुलामीचे संमोहनशास्त्र कसे शिकविले जाते यांचे प्रयोग आहेत. मूळ उपहास गर्भ कविता.
“मोर “मस्त .
“मोर आजाद होता तोपर्यंत आभाळात फिरून यायचा”
“आता अफुचित शेती आणि अफूचाच भात”
” दोन सरडे “युगकविता आहे.
राजकीय बदल व्यवस्थेचा भाग आहे.
बकरा आणि माणूस ,पक्षीप्रेमी ,गाय आणि देवता या कविता समाजमन जागृत करणाऱ्या आहेत .
“किसान आणि स्वातंत्र्य” शेतकरी सुखी कसा होईल? हमीभाव कसा मिळेल ?शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील ?जय जवान जय किसान हा कुलूपबंद नारा कुणी केला.हे आजचे प्रश्न .
खैरलांजी आणि कोपर्डी हा भेदभाव काय ? संविधानाच्या कविता कवितासंग्रहाचे सोनेरी पान! लोकशाहीची तब्येत बरी नाही भ्रष्ट शासन व्यवस्था! मित्राला संदेश कविता मस्त! नवीन जादूगार सुंदर अभिव्यक्ती .
नवीन घाशीराम कोतवाल आणि भीमा कोरेगाव दीर्घ कविता .इतिहासाची साक्षीदार युगसाक्षी कविता. शूर योद्धांना वंदन.
“माय मराठी माय मराठी खरे सांगू
तू तुझी मुले बोलती एकच भाषा
जेवणाच्या ताटावर विषमतेच्या माशा
खैरलांजी कोपर्डी सोनई मध्ये
का वाजवतात वेगळाच ढोल आणि वेगळाच ताशा “(107 )
जीवनसहचारिणीसाठी दोन शब्द ,अप्रतिम कविता. आदरांजली कबीर अंगार सर, संघरक्षक सुखदेवे सर, बाबाराव बाबळे सर, राहुल वासनिक,सुपती देशभ्रतार यांना भावपूर्ण आदरांजली, आसवांजली वाहने हे जिवंत कोणाची लक्षणे आहेत. चळवळीतील कार्यकर्ते मनात जपून ठेवले .हे स्मरण भारतरत्न इतकेच महत्त्वाचे आहे .
नामदेव ढसाळ :विद्रोही ज्वालामुखी ,
मार्शल केतन पिंपळापुरे:आंबेडकर आंदोलनातील सूर्यफूल,
राजा ढाले:सम्यक क्रांतीचे सेनापती ,
विमलसुर्य :आंबेडकर आंदोलनातील वॉल्टेअर.
या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या कविता मुळातून वाचण्यासारख्या आहेत .
पॅंथर ही काळाची गरज आहे .
पँथरने क्रांतीकारी वाट दिली .
नव्या युगाची सुरुवात झाली .
पँथर कविता झाली .
कविता पँथर झाली .
समता सैनिक दल पुढे आले .
त्यांनी सामाजिक क्रांतीचे ऊर्जायन दिले. समता सैनिक दल
समाजाचे भूषण आहे .
समाज व संविधान संरक्षणाची जबाबदारी समता सैनिक दल पार पाडीत आहे.
मुखपृष्ठावर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मलपृष्ठावर पुरुषोत्तम संबोधी यांचे छायाचित्र बरेच काही सांगून जाते .
अजय रामटेके
23 फेब्रुवारी 2025
काषाय फिनिक्स (कवितासंग्रह)
प्रकाशक समता संघर्ष प्रकाशन
द पीपल इरा 1
नेताजी मार्केट नागपूर
440012
सहयोग राशी 300 रुपये.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत