“सौम्या हत्याकांडप्रकरणी चारही आरोपीना दोन प्रकरणात स्वतंत्रपणे जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.”

साकेत न्यायालयाने २००८ मध्ये दिल्लीतील पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणातील चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रवी कपूर, अमित शुक्ला, बलबीर मलिक आणि अजय कुमार यांना या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.
दिल्लीतील महिला पत्रकार सौम्या विश्वनाथन यांची ३० सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीतील नेल्सन मंडेला मार्गावर हत्या करण्यात आली होती. सौम्या नाईट शिफ्ट करून ऑफिसमधून घरी जात होती. पोलिसांना सौम्याचा मृतदेह तिच्या कारमध्ये सापडला होता.
न्यायालयाने चार आरोपीना दंडही ठोठावला आहे. सर्व दोषर्षीना मकोका अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता, चारही आरोपीना दोन प्रकरणात स्वतंत्रपणे जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत