रमाई अकॅडमी येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ..


सोलापूर : रविवार दिनांक 3 रोजी सायंकाळी सहा वाजता रमाई अकॅडमी निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात प्रशिक्षित विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी रेल्वे मध्ये आणि एक विद्यार्थिनी आयु. प्राजक्ता रत्नदीप म न पा पुणे शहर शिक्षण विभागात नियुक्त करण्यात आली आहे. त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
अनुक्रमे आयु. नीता मंडला, आयु. प्राजक्ता रत्नदीप कांबळे, आयु. भावेश जाधव, आयु. अखिलेश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात प्राचार्य सोनकांबळे सरांनी या सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच यांचा आदर्श अन्य सर्व विद्यार्थांनी घ्यावा असे आवाहन केले. कष्टाला पर्याय नाही, असे सांगून ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने कष्ट करून आयुष्यात यशस्वी झाले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
रमाई अकॅडमी निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एम डी शिंदे सर यांनी पालकांच्या कष्टाला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आजच्या स्पर्धेच्या काळात कठोर परिश्रम घेतले पाहिजेत असे आवाहन केले.
सरकारी नोकऱ्यांध्ये घट झाली आहे, त्यामुळे आरक्षण नष्ट होत आहे. अशा परिस्थितीत आपल्या देशात अत्यंत प्रतिकूल वातावरण निर्माण झाले आहे, याचे भान आपल्याला असेल पाहिजे, तरच आपल्या प्रयत्नाला यश प्राप्त होईल.
रमाई अकॅडमी आपल्यासाठी हवी ती मदत करत आहे. बहुजन विचारमंच सोलापूरचे सभासद स्वेच्छेने हवी ती पुस्तके देणगी रुपाने उपलब्ध करून देत आहेत. त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा तसेच प्रभावी मार्गदर्शन देणारे प्राचार्य सोनकांबळे आणि प्राचार्य शंकर खळसोडे यांच्या कष्टांचे सार्थक करावे असे आवाहनही डॉ शिंदे सरांनी केले.
सत्काराला आयु. प्राजक्ता, आयु. नीता, आयु. अखिलेश आयु. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले आणि रमाई अकॅडमीचे प्राचार्य सोनकांबळे आणि खळसोडे सरांचे मार्गदर्शन नक्कीच लाभदायक ठरल्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी अकॅडमीचे विद्यार्थी तसेच बहुजन विचारमंच सोलापूरचे अध्यक्ष आबासाहेब साबळे, सचिव मिलिंद ताकपेरे, कोषाध्यक्ष डॉ अविनाश घोरपडे, मार्गदर्शक डॉ. अरुणकुमार उपस्थित होते.
शेवटी प्राचार्य सोनकांबळे सरांनी सर्वांचे आभार मानले.
अल्पोपहार, चहापान झाल्यानंतर
कार्यक्रम संपन्न झाला.
????????????????????????????????????????
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत