दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणराजकीय

बदलापुरात भारतीय संविधान सन्मान रॅली संपन्न

दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिना निमित्त
R.P.I (R.K) पक्ष कार्यालय, बदलापूर (प) येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पक्षाध्यक्ष मा. राजाराम खरात यांच्या नेतृत्वात श्री कॉम्प्लेक्स, बेलवली, बदलापूर (प) येथून संविधान सन्मान रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. तेथून संविधानाचा जयघोष करीत सदर रॅली बदलापूर एसटी बस स्थानक जवळ छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून छ. शिवरायांना वंदन करण्यात आले. त्यानंतर सदर सन्मान रॅली बाजारपेठ मार्गाने संविधानाचा जयघोष करीत तसेच संविधानाचा जागर करीत संविधान स्मारक रमेशवाडी येथे पोहोचली, सदर ठिकाणी शाहीर अशोक कांबळे, तसेच शाहीर वाघमारे, मानेश जाधव व शाहीर बनसोडे ताई यांनी त्यांच्या भारदस्त आवाजात संविधान पर गीते तसेच भीम गीते सादर केली. तसेच सदर ठिकाणी एक सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मा. सतीश देशमुख यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांनी पक्षाध्यक्ष मा. राजाराम खरात यांच्या कार्याबाबतचा गुणगौरव करीत असताना ते म्हणाले की “राजाराम खरात हे सामान्य कार्यकर्त्यांची सहानुभूतीपूर्वक विचारपूस करीत असतात आणि म्हणून त्यांनी हाक देताच आम्ही धावून येत असतो व आमच्या परीने शक्य ते सहकार्य करीत असतो” असे ते म्हणाले त्यानंतर राष्टवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र सरचिटणीस मा. हेमंत रुमणे साहेब यांनी सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत या संविधान सन्मान रॅलीला संबोधित केले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.) पक्षाचे एक मित्र पक्ष म्हणून मा.राजाराम खरात साहेबांच्या कामाची स्तुती केली. या संविधान सन्मान रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मा. अविनाश देशमुख साहेब, पत्रकार मा. निलेश पवार, मा. अभिजीत सकट साहेब, प्रिया गायकवाड ताई, वंदना भगत ताई यांनी उपस्थित राहून सर्वाना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रा. अनिल भालेराव यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्व जनतेला शुभेच्छा व्यक्त करताना म्हटले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रमपूर्वक या संविधानाची निर्मिती केलेली आहे आणि अतिशय उत्कृष्ट असे हे संविधान आपल्या देशाप्रती अर्पित केले आहे. त्यानंतर सदर कार्यक्रमाकरिता निमंत्रित करण्यात आलेले प्रमुख व्याख्याते एड. किशोर कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, व न्याय ही मूल्ये विचारात घेऊन संविधानाची निर्मिती केली आहे.

परंतु, या संविधानाची अंमलबजावणी योग्य रीतीने होणे गरजेचे आहे. याकरिता, जनतेने जागरूक राहून त्याबाबत सतर्कता दाखवणे आवश्यक आहे. त्यानंतर मा. मिलिंद सकपाळ यांनी आपले भाषण करीत असताना उत्कर्ष सेवा मंडळाचे सर्व सदस्य व सहकारी यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले, तसेच त्यांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर एड. गजानन लासुरे साहेब हे आपल्या भाषणाच्या वेळी म्हणाले की मा. राजाराम खरात यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की, “कोई ऐसा काम ना करो की कोई बोले झूठ ! और ऐसी जगह पर बैठो की कोई ना बोले उठ !” तसेच राजाराम खरात हे आंबेडकरी चळवळीतील सच्चा कार्यकर्ता आहेत, तसेच त्यांना अनेक कार्यकर्ते घडवायचे आहेत व ही आंबेडकरी चळवळ निरंतर चालू ठेवायची आहे तसेच संविधानाबाबत ते असे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय परिश्रम पूर्वक या संविधानाची निर्मिती केली आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर चांगल्या मनोवृत्तीचे नसतील तर, त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने होणार नाही आणि त्याचा प्रत्यय सध्याच्या परिस्थितीमध्ये येत आहे. संविधान आपण रोज वाचले पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, ते समजून घेतले पाहिजे, तसेच संविधानाची अंमलबजावणी योग्य रीतीने होते की नाही यावर नजर ठेवणे गरजेचे आहे. तसेच ते पुढे म्हणाले की ज्या-ज्या वेळी अमेरिका यासारख्या देशांमध्ये काही समस्या निर्माण होतात त्या- त्या वेळी भारतीय संविधानाचा आधार घेतला जातो. त्याचा संदर्भ घेतला जातो, यावरून भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित होते. तसेच या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.के.) पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद, महिला मंडळ, युवा उपस्थित होते. सदर कार्यक्रमात संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले, सदर कार्यक्रमाच्या वेळी सर्व उपस्थित नागरिकांना अल्पोपहार देण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्वप्निल शिर्के (भाऊ) व प्रेसेनजीत सोनवणे यांनी केले. सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली, सदर कार्यक्रम मा. अशोक गजरमल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. शेवटी अध्यक्षांचे भाषण झाले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!