नळदुर्ग शहर होणार रहदारी मुक्त

हायवे बायपासला हिरवा कंदील
शिवसेना [ ठाकरे गटाच्या ] कार्यकर्त्यांनी दाखविला हिरवा झेंडा
हायवेवर गाड्यांची रहदारी वाढली आपघाताचे प्रमाण ही वाढले बायपास मोकळा केला
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
हैद्राबाद सोलापूर राष्ट्रीय हायवे महामार्ग क्रमांक ६५ नळदुर्ग नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बायपास ला हिरवा झेंडा दाखविला आहे .
नळदुर्ग शहर शिवसेने [ ठाकरे ] गटाच्या कार्यकर्त्यांनी हिरवा कंदील दाखवुन हायवे बायपास तात्काळ चालू करण्यास भाग पाडले आहे .
नळदुर्ग ते जळकोट या सात किलो मीटरच्या अंतरावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे आणि झालेले आपघात या पडलेल्या खड्डया मुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे .हायवे ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा आशा प्रकारची मागणी अनेकदा करण्यात आली . अनेक वेळा टोल नाका ही फोडण्यात आला निदर्शने अंदोलने उपोषणे करण्यात आली तरी ही ह्या गुत्तेदाराला दया मया आली नाही
नळदुर्ग येथे घाटात आपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले शहरातली रहदारी वाढली लहान मोठे वाद निर्माण झाले या गोष्ठी लक्षात आणून दिल्या आणि कंपनीचे
S U C संचालक बालाजी गायकवाड यांनी याकडे जातीने लक्ष घालून हा नळदुर्ग शहरातुन जात आसलेला राष्ट्रीय हायवे क्रमांक ६५ हा तात्काळ करण्यासाठी आदेश दिला हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ बायपास पुर्ण होताच प्रजासत्ताक दिनी हा हायवे चालू करायचा होता पण काही तांत्रिक कारणांमुळे हा रोड २७ जानेवारी रोजी चालू करण्यात आला . हायवेवर गाड्यांना शिवसेनेचे नेते कमलाकर काका चव्हाण यांनी बोर्डाला हार घालून रोडवर श्रीफळ वाढवून हा हायवे चालू करण्यात आला यावेळी, माजी नगरसेवक बसवराज धरणे , जेष्ठ पत्रकार विलास येडगे , शहर प्रमुख संतोष पुदाले , नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , पत्रकार उत्तम बनजगोळे , अतुल हजारे , राजू ठाकुर , सोम म्हेत्रे , नेताजी महाबोले , पत्रकार आयुब शेख , पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी महामार्गावरील गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून बायपास चालू केला अनेक चालकानी समाधान व्यक्त केले आणि आभार ही मानले
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत