शिक्षक हाऊसिंग सोसायटीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सोलापूर : येथील शाक्य संघ, यश सिध्दी माजी सैनिक आणि दक्षिण सदर परिसरातील शिक्षक हौसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, २६ जानेवारी रोजी ७६ वा भारतीय प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनी, शाक्य संघ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर व यशसिध्दी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक हौसिंग सोसायटीत प्रजासत्ताक दिन बिगुल वाजवून मानवंदना देऊन साजरा केला. याप्रसंगी संविधानाचा विजय असो, प्रजासत्ताक दिनाचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
याप्रसंगी शिक्षक हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन प्रदीप ताकपिरे, सदस्य अंबादास कदम, उत्तम क्षिरसागर, मल्लेश शिंगे, सुरेश क्षिरसागर, शेखर शिवशरण, सौ. सुनिता दिलपाक आणि सौ. अॅड. मंजुषा लोखंडे, सुर्यकांत डावरे, प्रभाकर भालेराव, मंजुषा ताकपेरे, आनंद कांबळे, अरुण साबळे, कांचनगंगा डावरे, शशिकला ओहोळ, आशा गायकवाड, यशसिध्दी आजी माजी सैनिक वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवपुत्र घटकांबळे, मधुकर माने, सुर्यकांत गजघाटे, कमलाकर कांबळे आणि शाक्य संघाचे अध्यक्ष डॉ. अंगद मुके, अशोककुमार दिलपाक, शांताराम वाघमारे, नागेश गायकवाड, अंबादास बनसोडे, व्यंकटेश सोनवणे यांच्यासह शाक्य संघाचे बौध्द उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत