विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन

रक्तात पेटलेला सूर्य
कोणी झाडांवर
कोणी फुलं पानांवर
तर कोणी रेखाटल्या ओळी
प्रेमाच्या गाण्यांवर
पण
सगळ्या अफूच्या गोळ्या
फक्त क्षणिक झुलवणाऱ्या
त्यांना दिसल्या नाही का टोळ्या?
अत्याचाराने माणसं तुडवणाऱ्या
म्हणून
तू गायलसं माणसाचं गाणं
ओव्यातून…
शिव्यातून…
आणि
विद्रोही काव्यातून…
तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर
ठोकलस तू जातीवाद्यांना!
तू वाचलास पाढा बंडखोरीचा
बलात्कारी शील चोरीचा
हाटा-हाटातून बाटवणाऱ्या पोरीचा
विषमतेच्या दुर्गंधी मोरीचा
आणि
जात बघून फाशी देणाऱ्या दोरीचा
तुझ्या पँथर ची आज ही आठवण येते…
जेव्हा
जाळली जातात घरं दारं
कापली जातात बाया पोरं
आजही गुरा ढोरा सारखी
रस्त्या रस्त्यांवर
वस्त्या वस्त्यांवर
जाती धर्माच्या नावाखाली
तेव्हा वाटतं पेटून उठावं
तुझ्या रक्तात पेटलेल्या
अगणित सूर्यां सारखं
आणि करावी राख रांगोळी
त्या अत्याचाराने वखवखलेल्या
भुकाळ वस्त्यांची
तुझ्याच लेखणीच्या
ओव्यातून…
शिव्यातून…
आणि
विद्रोही काव्यातून…
कवी –
सुमेध वंदना मधुकर सोनावणे
9967162063
विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांस स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत