देशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

कळतंय का?————————विशाल हिवाळे

आंबेडकरी चळवळीचा दरारा संपवत या परिवर्तनवादी चळवळीला षंढवादी करण्यात प्रस्थापित धर्मांध विद्यमान राज्यकर्ते यशस्वी होत आहेत.कारणेही तशीच आहेत.परभणीत आंबेडकरवादयांवर कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली अमानूष आणि बेछुट हल्ला केला.घराघरात घूसून बेदम मारले.इतके मारले की एक पोलिसी अत्याचारात शहीद झाला.दुसरे हा अन्याय सहन होत नाही म्हणून हृदय विकाराच्या झटक्याने शहीद झाले.शकडोंचे हात-पाय मोडले तर अनेकांना जब्बर जखमी केले.अशा अनेक हल्ल्यांच्या माध्यमातून आंबेडकरवादी चळवळीवर दहशत निर्माण करण्याचा कृती कार्यक्रम राबवला गेला आणि म्हणूनच करोडोंच्या मुक्तीदात्याचा अपमान करणाऱ्या तडीपार विरोधात साधा निषेधही महाराष्ट्रात झाला नाही.हे तडीपार केंद्रीय गृहमंत्री भाजप अधिवेशनाला शिर्डीत येऊन भाषण ठोकुन गेले.ज्या महामानवाने संसदेत बोलण्याचा अधिकार दिला, संसद आणि बोलण्याचा संविधानिक अधिकार मिळवून दिला त्या संविधान व संसद निर्मात्याचा घोर अपमान करण्याचा गुन्हा गृहमंत्र्यांनी केला.देशातील उपेक्षित घटकांना लढण्याची प्रेरणा देणाऱ्या आक्रमक आंबेडकरवादी चळवळीतुन गृहमंत्री महाराष्ट्रात येताना किंचितही विरोध झालेला दिसला नाही.दोन दशका पूर्वीची आणि 72 नंतरची आंबेडकरी आणि पॅंथर चळवळ आठवून बघाच.देशाचे पंतप्रधान असोत नाही तर स्वतः ला हुकुमशाहा म्हणविणारे कुणीही असोत आंबेडकरवादी चळवळीने ललकारलेलं आहे.समोरच्याला आव्हान देऊन पळता भूई थोडी केलेली आहे.कळतंय का ?बघा आठवून
हि आक्रमकता अन्याया विरोधात पेटून उठण्याची जिगर या देशातल्या मनुवादी विचारांच्या सडक्या विकृतीने नष्ट करण्याचा निश्चय केला आहे.संविधान विरोधी हि विकृती सातत्याने नियोजनबद्ध हल्ले प्रशासनाच्या माध्यमातून करवून घेत आहे.आंबेडकरवादी चळवळीला यावर चिंतन करून, संघर्ष करण्याचे नियोजन करावे लागणार आहे.भविष्यातील संकटे लक्षात घेता तातडीने हि पावले उचलावी लागतील.नाही तर शहीद सोमनाथ, शहीद विजयदादा वाकोडें सारखे शहीद वस्त्या-वस्त्यांमध्ये व गावा गावात धारातिर्थी पडत राहतील. हात-पाय तुटलेल्या जखमींची आणि गंभीर गुन्हे घेऊन जगणाऱ्यांची संख्या तर घराघरात असेल.
वास्तव आणि परिस्थिती गंभीर होत चाललीय तेव्हा वेळीच सावध व्हावे लागेल.असमांत दणाणून व घसा फाटे पर्यंत दिल्या जाणाऱ्या घोषणांना योग्य व नियोजनबद्ध कृतीची जोड नसेल तर त्या घोषणा केवळ पोकळ घोषणाच राहतील.

–विशाल हिवाळे
(संविधान अभ्यासक आणि प्रचारक)
9022488113

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!