” जिजाऊ जयंती निमित्त महिलांचा अनोखा उपक्रम “स्वतः च्या घरावर लावल्या आपल्या नावाच्या पाट्या.

कारी :- कोरो इंडिया मुंबई यांच्या मार्फत ग्रासरूट लीडरशिप व संस्था विकास कार्यक्रम महाराष्ट्रभर चालू आहे. धाराशिव जिल्ह्यात ग्रामगिता सोशल ट्रस्ट हि संस्था या उपक्रमात सहभागी आहे. 12 जाने 2025 रोजी राष्टमाता, राजमाता यांच्या जयंती निमित्त कारी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना व भारतीय संविधान प्रस्तावना वाचन करून झाली. प्रथम ग्रामगिता च्या कार्यकर्त्यां व फेलो मनीषा गायकवाड व सुवर्णा पंढरे यांनी महिला सक्षीमिकारण बाबत केलेल्या कामाचा आढावा सादर केला.
या गावात कोरो इंडिया च्या माध्यमातून मागील सहा महिन्यापासून महिला संपत्ती अधिकार, एकल महिला संघटन, संविधान जागृती, आरोग्य विषयक हक्क इत्यादी बाबत कार्य चालू आहे. मागील काही दिवसांपूर्वी महिलांना संपत्तीत अधिकार मिळावा व आपले नाव त्या संपत्तीवर असावे याबाबत मार्गदर्शन कोरो इंडियाच्या कार्यकर्त्या लक्ष्मीताई वाघमारे यांनी केले होते.
कोरो इंडिया च्या माध्यमातून मिळालेले मार्गदर्शन याचा प्रभाव महिलांवर पडलेला होता म्हणून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या औचित्य साधून महिलांनी आपल्या नावाच्या पाट्या तयार करून माननीय लक्ष्मीताई वाघमारे यांच्या हस्ते बसवण्यात आल्या तसेच पुढील काळात ग्रामपंचायत कडे ग्रामसभेमध्ये ठराव करून कायदेशीर रित्या महिलांचे नाव घराच्या उताऱ्यावर लावणे बाबत कार्य करण्यात येणार आहे. असा निर्धार महिलांनी केला.
या कार्यक्रमात लक्ष्मीताई यांनी महिलांना मार्गदर्शन केले व महिला मध्ये प्रेरणा निर्माण केली. तसेच संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वडवे, सुधाकर बुकन व पत्रकार विद्यानंद वाघमारे, बाबासाहेब घरबूडवे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन सुवर्णा पंढरे यांनी केले.आभार मनीषा गायकवाड यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरस्वती चोधरी, शारदा गायकवाड, राणी वाघमोडे, यांनी विशेष परिश्रम घेतले
” जिजाऊ जयंती निमित्त महिलांचा अनोखा उपक्रम “
स्वतः च्या घरावर लावल्या आपल्या
नावाच्या पाट्या.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत