
विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली. नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. स्वतः चोरूनलपून शिक्षण घेतल्याने शिक्षणाचे महत्त्व स्वतःला कळले म्हणून बहुजनांची अधोगती केवळ शिक्षण नसल्याने झाली, म्हणून बहुजनांनी शिकावे म्हणून त्यांनी १ जानेवारी १८४८ ला ( राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले ) स्त्रियांसाठी पहिली शाळा काढली आणि बहुजन समाजाचा शिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा केला.त्याचप्रमाणे एक जानेवारी हा भीमा कोरेगाव युद्धासाठी सुद्धा ओळखल्या जातो तो सुद्धा बहुजन समाजाच्या मुक्तीसाठी लढल्या गेलेला लढा होता.ते युद्ध झाले नसते तर पेशवाई भारतातून संपली नसती, म्हणून ५०० शुरवीरांनी ( त्यामध्ये २५० पेक्षा अधिक महार होते,५० इंग्रज होते, उरलेले सर्व बहुजन मराठे होते ) ५०० शुरविरांनी २८००० हजार पेशव्यांना कापून काढले . म्हणून भिमा- कोरेगावच्या लढ्यात भाग घेतलेल्या शुरविरांना ५६ इंचांची छाती चे शुरवीर महणून ओळखळे जाते हा खरा भिमा- कोरेगावचा इतिहास आहे. ५०० शुरवीरांनी पराक्रम गाजविला नसता तर पेशवाई महाराष्ट्रातून गेली नसती . इंग्रजांचे राज्य आले नसते,इंग्रजांचे राज्य आले नसते तर महात्मा फुले शिकू शकले नसते आणिते जर शिकले नसते व इंग्रजांची सत्ता नसती तर बहुजनांसाठी त्यांना शाळा सुद्धा काढत्या आल्या नसत्या. महात्मा फुले म्हणायचे इंग्रजी माऊली, इंग्रजी साऊली | इंग्रजी शिकुनिया, भटा- भारूड गाडुनि टाका. महात्मा फुलेंना शिक्षणामुळे येथील मनुवादी व्यवस्था कळली . त्यांच्या विरोधात त्यांनी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. शेतकऱ्याचा वेश धारण करून इंग्रज सरकारला शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारी दरबारी मांडल्या. शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था निर्माण करण्यास इंग्रज सरकारला भाग पाडले. स्वतः इंजिनिअर असल्याने ‘ खडकवासला ‘ धरण बांधले. साचलेल्या पाण्यावर शेती केल्यास शेती वाया जाते, शेती पिकत नाही. शेती नेहमी पावसाच्या पाण्यावरच करावी अशी अंधश्रद्धा येथिल मनुवाद्यांनी शेतकऱ्यांत पसरविली होती . म्हणून कुणीही शेतकरी त्या धरणाचे पाणी वापरून शेती करीत नव्हते . लोकांमधील भिती जावी म्हणून स्वतः फुलेंनी फुलांची व बागायती शेती करून भरपूर उत्पन्न काढले, मग लोकांची भिती दूर झाली. शेतकऱ्याचं एवढं अझान घालविण्याचे काम फुलेंनी केले केवळ शिक्षणामुळे . फुल्यांचा आदर्श घेऊन बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहूजी महाराज यांनी सुद्धा या मनुवादी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला व छत्रपती शाहूजी महाराजांनी बहुजनांना भारताचा इतिहासात पहिल्यांदा 50 टक्के आरक्षण सुरू केले व बहुजनांच्या गरीब मुलांना शिक्षणासाठी मोफत वस्तीगृहाची निर्मिती करता येते ही नवीन संकल्पना सुद्धा त्यांनी निर्माण केली . या सत्यशोधकी विचारधारेमुळेच या दोन्ही राजांनी ज्या व्यक्तीला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले ती व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर . त्यांनी भारतात येऊन सत्यशोधक विचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन मनुवादी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला व त्यांच्या उच्चशिक्षणामुळेच त्यांना या भारताची राज्यघटना लिहिण्याची संधी प्राप्त झाली व त्यांनी या देशातील मनुस्मृति नष्ट करून बहुजनांना स्वातंत्र्य,समता,बंधुत्व अशी वागणूक देणारी सर्वांग सुंदर संविधान या देशाला दिले ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ह्यांच्या बौद्धिक कल्पनेने सर्व गोष्टी होऊ शकल्या कारण की त्या एक जानेवारीचा भीमा कोरेगाव युद्धात पेशव्यांचा पराभव झाला.त्यामुळे या दोन्ही गोष्टी अतिशय ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या आहेत बहुजन समाजासाठी . पेशवाईत तुकाराम महाराजांच्या अभंगावर किर्तन करता येत नव्हते आणि रामदासांचा सत्संग जोरात चालू होता .एवढी ॲलर्जी पेशव्यांना तुकाराम महाराजांच्या अभंगाची होती. एकाही ब्राम्हणांमध्ये तुकाराम. शिवाजी व संभाजी नावे सापडत नाही. महात्मा फुलेंनी मुलींसाठी जी पहिली शाळा काढली, त्यासाठी स्वतःचा वाडा व जागा देणारे भिडे हे ब्राम्हणच होते. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. जो पर्यंत लोकांच्या ओठावर व तोंडात फुले आहेत, तोवर भिडे साहेब व त्यांचा भिडेवाडा देखील जिवंत राहील यात कुठलाही संशय नाही.
सर्वांना १ जानेवारी या ऐतिहासिक दिनाच्या मंगलमय शिवमय शिवशुभेच्छा .
🐅 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय भिम, जय संविधान 🐅
🌴 शिवश्री केशव ठमाबाई महादु करण .🌴
मु. आष्टे , पो. खरीड , ता. शहापूर , जि. ठाणे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत