गुंडोके सरदार

नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस कितीही साळसूदपणे भाषणे देत असतील तरीही ते खरे नाही.ते वरवरचे बोलणे आहे.पण आतून गुंडगिरी वाढवलेली आहे. बीड,परभणी, जळगाव जिल्ह्यातील आमदारांना मोदी आणि फडणवीस यांनी मंत्री पदे दिलीत.जसे काही मोदी आणि फडणवीस यांची खाजगी मालमत्तेची जहागिरी दिली.महाराष्ट्र ही सार्वजनिक मालमत्ता आहे.त्यासाठी सार्वजनिक विचार करूनच मंत्रीपदे दिली पाहिजे.साडी आणि भांडी सारखी खिरापत समजून देता येत नाही.पण तितकी प्रामाणिक विचारधारा मोदी आणि फडणवीस यांचेकडे नाही.त्यांनी मंत्रीपदे त्यांच्या वैयक्तिक स्वार्थ साधून दिली आहेत.
तिकडे बीड मधे धनंजय मुंडे धुमाकूळ घालत आहेत.माणसे मरत आहेत.लोक आक्रोश करीत आहेत.इकडे जळगाव मधे गुलाबराव पाटील रावण बनले आहेत.यांना फडणवीस यांनी जाणिवपूर्वक मंत्री पदे देऊन काय साध्य केले?
फडणवीस हे हिंदू धर्मातील ब्राह्मण आहेत.माणूस आणि ईश्वर यांचेतील आम्ही हिंदूंचे मध्यस्थ आहेत.ज्यांची आम्ही अशिक्षित हिंदू प्रत्येक विधीसाठी मदत घेतो.ते एलएलबी आहेत.म्हणजे कायद्याचे ज्ञान आहे.ते आरआरआएस चे छात्र आहेत.म्हणजे हिंदू तत्वज्ञान जाणून आहेत.त्यांना प्राणापेक्षा धर्म आणि देश प्रिय आहे.असे तेच सांगतात.तर मग गुंड गुन्हेगारांना मंत्री बनवण्याचा उद्देश काय?खूप वाईट आणि दुष्ट हेतू असला पाहिजे.
बीड परभणी प्रकरणावर मोठा महाग्रंथ बनला आहे.एका प्रोफेसरला किंवा न्यायाधिशाला वाचणे शक्य नाही.तसेच मोठे रामायण जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे घडले.घडत आहे.याकडे फडणवीस यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.मुंडे आणि गुलाबराव यांचा राजीनामा घेतला पाहिजे.ते देणार नाहीत.तर हकालपट्टी केली पाहिजे.
रेती माती हप्ते वसुली,बोगस जमीन खरेदी प्रकरणी खडसेंचा राजीनामा फडणवीस यांनी घेतला होता.तेंव्हा तुम्ही प्रामाणिक होते का?कारण खडसे तुम्हाला हप्ते मधून हिस्सा देत नव्हते.तर मग मुंडे आणि गुलाबराव यांनी अँडव्हान्स दिला आहे का? त्याशिवाय त्यांचे विषयी इतके प्रेम दाटून येणार नाही.
मुलाने हाणामारीचा गुन्हा केला असेल,पत्नीचे नांव सहभागी होत असेल तर असा माणूस मंत्री म्हणून शासनात ठेवणे चुकीचे आहे.हे न समजण्यासारखे फडणवीस अशिक्षित नाहीत.नादान नाहीत.हेतू दुष्ट असू शकतो.परिणाम सदृश्य पुरावा उपलब्ध आहे.फडणवीस साहेब,कम टू द पॉईंट.
गुलाबराव पाटील यांची निर्मिती आणि बढती ही राजकीय नाही.हे राजकारण चटणीला ही घेत नाहीत.यांचा इतिहास गुन्हेगारी स्वरूपाचा आहे.ते कोणतेही राजकीय काम करीत नाहीत.आता कोरोना काळात औषधी व वैद्यकीय यंत्रसामुग्री बोगस खरेदी प्रकरण जळगाव कोर्टात दाखल आहे.तेथेही न्यायाधीश जाणिवपूर्वक खटला चालवण्यात टाळाटाळ करीत आहेत.कारण गुलाबराव पाटील मंत्री आहेत.न्यायाधिशांनाही मंत्रीची भीती वाटते.उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना खुष कसे करून ठेवले असेल? कोणीही मुख्यमंत्री बनला तरीही मंत्रीपद राखीव ठेवले जाते.
मला तर नरेंद्र मोदी यांच्यावर संशय येतो.गुलाबराव पाटील यांनी इतकी मालमत्ता मिळवली. तरीपण त्यांचेवर इडीची कारवाई करीत नाहीत.काहीतरी खास कारण असेलच.
नरेंद्र मोदी और देवेंद्र फडणवीस तुम इधर उधर की बाते मत करो!लोगोको गुमराह मत करो!पहले तो मुंडे और गुलाबराव को मंत्री पदसे हटाओ!तब समजे कि तुम इमानदार हो!नही तो हम समझे ,तुम गुंडोके सरदार हो!
…. शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत