देशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

भारतातील जाती-पातींची निर्मिती

भारतातील जाती-पातींची निर्मिती मुस्लिमांची आणि इंग्रजांची देन आहे का ? की मनुस्मृतीच्या समर्थकांची ही देन आहे ?

भ्रमवादी लोकांनी अनेक अभ्यासक्रमामध्ये परिवर्तन करून एक चुकीची सूचना मुलांच्या पुस्तकांमध्ये समाविष्ट होती की जाती-पातींची निर्मिती तर मुस्लिमांची आणि इंग्रजांची देण आहे.

असे षडयंत्र भ्रमवादी लोकांनी यासाठी केले की पुरातन व खऱ्या दोषी असलेल्यांना वाचविल्या जाऊ शकेल,ज्यांनी हजारो वर्षे अगोदरच जाती-पातींच्या या रोगाची सुरुवात केली होती.

परंतु शास्त्रज्ञांनी आपल्या नुकत्याच केलेल्या अध्ययनाद्वारे या भ्रमवादी लोकांचे षडयंत्र आणि खोटारडेपणाचा विज्ञानाच्या आधारे भंडाफोड करून सांगितले आहे की जाती-पातींची निर्मिती ही मुस्लिमांची किंवा इंग्रजांची देन नसून हा हजारो वर्षांपूर्वीचा रोग आहे. कारण की जनुका (जीन) मधील विकृती मुस्लिम आणि इंग्रज यासारख्या शंभर दोनशे वर्षापूर्वी घडलेल्या घटनेमुळे निर्माण होत नाही.

मागील काही दिवसांमध्ये भारतातील अनेक जनसमुहांच्या जनुकांचा म्हणजेच जीन चे विश्लेषण(genome-scale analysis) केल्या गेले, ज्याला आजपर्यंतचे सर्वात मोठे आणि प्रचंड संशोधन म्हटल्या जात आहे. संशोधन संयुक्त रूपाने खालील वैज्ञानिक संस्थांनी केलेले आहे.

  1. The Centre for Cellular and Molecular Biology (CCMB) Hyderabad,

2.Harvard medical school, USA

3.Harvard School of Public Health,USA

  1. Board Institute of Harvard,USA.

5.MIT , USA

वरील संस्थेच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनावरून निश्चित झाले आहे की आपल्याच जाती आणि आपल्या समुदायांमध्ये लग्न करण्याच्या या पुरातन प्रथेच्या कारणामुळे भारतीय लोकांमध्ये जीन परिवर्तन (genetic mutation) झाल्यामुळे भारतीय समाज इलाज न होऊ शकणाऱ्या थलसेमिया(Thallasaimia), हृदयरोग गंभीर रोगांनी ग्रस्त झालेला आहे.

भारतातील हृदय रोगाच्या घटना या जगातील घटनेपेक्षा अगदी वेगळ्या आहे, कारण की अशा प्रकारच्या गंभीर आजारांना जीन च्या अध्ययनाद्वारेच जानू व समजू शकते.

तर अशाप्रकारे भारतातील लोकांना आज जे गंभीर आजाराने ग्रस्त केले आहे त्याच्या मुळाशी भारतातील जाती-पाती या कारणीभूत आहे. या जाती-पातींची निर्मिती मुस्लिमांनी आणि इंग्रजांनी केलेली नसून भारतातील मनुस्मृतीला मानणाऱ्या भ्रमवादी लोकांनी केलेली आहे, हे सिद्ध होते.

गंगाधर नाखले
01/01/2025
7972722081

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!