मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

परभणी आणी बीडच्या केसकडे कुणी वेगळे ऍंगल लावून पाहू नये

परभणी आणी बीडच्या केसकडे कुणी वेगळे ऍंगल लावून पाहू नये. बीडच्या केस मधे आता धसांच्या आरोपानंतर बाई चं चारीत्र्य वगैरे ऍंगल आला आहे.
अशा केसेस मधे थोडं भान बाळगलं पाहीजे. ऑलरेडी त्यात राजकारण सुरू आहे.

बीडच्या केस मधे सरळ सरळ मुंडेंचं वर्चस्व संपवण्यासाठी सगळे प्रस्थापित पक्ष आणि जाती एकवटलेल्या दिसत आहेत. मुंडेंचा पक्षच विरोधात आहे आणि अन्य पक्षांच्या मदतीने मुंडेंचं राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न करत आहे. तर धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार गट सक्रीय झाला आहे. मुळात धनंजय मुंडे यांना शरद पवारांनीच फोडले. त्या वेळी धनंजय मुंडेंचे काय प्रताप आहेत हे माहिती नव्हतं का ? अजित पवारांचे प्रताप माहिती नव्हते का ? संजय राठोडचे प्रताप माहिती नव्हते का ? ते पक्षात होते तेव्हां भाजप आरोप करत होते आणि राष्ट्रवादी क्लीन चीट देत होते आता हे पक्ष सोडून भाजपात गेल्यावर यांनी आपापल्या चड्ड्या बदलल्या आहेत.

पूजा खेडकर प्रकरणामागून पंकजा मुंडे यांच्यावरच शरसंधान करायचे होते हे आता स्पष्ट झाले आहे.तसेच कोर्टात त्या वेळी एससी एसटी वर्गीकरण आणि क्रिमीलेयर ही केस होती. त्यासाठी क्रिमीलेयर बद्दल मीडीया भरभरून वाहिला. यावरून आरक्षणाच्या लाभार्थींमधे हजारो कोटी रूपये पैसा आलेला आहे असा समज घट्ट केला गेला ज्यामुळे कोर्टाला आरक्षणाला नख लावता आले.

मुद्दा सरळ आहे. बीड केस मधे शिक्षा व्हावी. तशीच परभणी केस मधे पण झाली पाहीजे.
बीड केस मधे सुरेश धस आमचा माणूस म्हणून बाजू मांडत आहेत. त्यांना शरद पवार गट साथ देत आहे. शरद पवार गटाला बौद्धांनी निवडून दिले मग परभणी केस मधे यांची तोंडं शिवलीत का संसद आणि विधानसभेत. त्यांचा अमोल कोल्हे कसली भाषणं ठोकतोय ? सुप्रिया सुळेंच्या भाषणात आहे का परभणी केसचा उल्लेख ? संसदेत पण हे बीड प्रकरणावर बोलले आणि संसदेच्या बाहेर परभणी प्रकरणावर बोलले.

संसदेच्या बाहेर आंदोलन केल्याने सरकारला उत्तर देणं बंधनकारक आहे का ?

गुन्हेगारी संपलीच पाहीजे. मग ती फक्त बीड नाही तर बारामती, मुंबई, कलानगर, वरळी, कृष्णकुंज, ठाणे, कल्याण, भिवंडी ,उल्हासनगर (पप्पू कलानी), नवी मुंबई, वसई विरार (भाई ठाकूर ) अशी सगळ्याच जिल्हातली संपली पाहीजे. फक्त बीड मधेच राजकीय गुन्हेगारी आहे असे समजण्याचे अजिबात कारण नाही.

बीडला वंजारी वर्चस्व मराठ्यांना सहन होत नाही. आधी फूट पाडून ताकद कमी केली. नंतर राष्ट्रवादी आणि भाजपने हातमिळवणी करून मुंडेंना पाडले आणि दुसरे ताटाखालचे मांजर असलेले मुंडे निवडून आणलेत. आता त्यांचे प्रताप बाहेर आल्यावर त्यांनाही नारळ देत आहेत.

या लोकांचे कुणा अभिनेत्याशी, अभिनेत्रींशी संबंध असतील तर आपण मधे पडू नये. ज्या अभिनेत्रीची बाजू सध्य़ा महिला घेत आहेत त्या अभिनेत्रीने बरेच अक्कलहुषारीचे तारे तोडलेले आहेत. ती हिंदुत्ववादी ग्रुप्सला सपोर्ट करते. त्या विचारधारेला सपोर्ट करते. महिलांच्या गुलामीच्या विचारसरणीला ती सपोर्ट करतेय आता तेच लोक उलटून पडलेत. तिला पुढे कोण करतंय ? त्याचे चारीत्र्य त्याच्या बेकायदेशीर बायकोने चव्हाट्यावर आणले आहे. त्याने केस का नाही केली ?

सरपंच हत्या प्रकरणात जाणूनबुजून ग्लॅमर वर्ल्ड आणून वेगळी पटकथा लिहीली जात आहे. जेणे करून ते प्रकरण मागे पडावे.
परभणी प्रकरण तर कसे दाबले जाईल याचा अंदाज यावरून यावा.

म्हणून भरकटवणार्या मुद्द्यांना हवा देऊ नका.
आपला फोकस फक्त सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकर्यांना शिक्षा !
कारण त्याच्यासाठी कुणीच न्याय मागायला तयार नाही.

अभिनेत्री सक्षम आहे, भक्कम आहे. राजकीय पाठिंबा आहे. मीडीया बाजूने आहे. हिंदुत्ववादी सर्कलचा पाठिंबा आहे. भिडेंचा पाठिंबा आहे. उगा तिच्यासाठी आपली एनर्जी खर्च करू नये.

Mandar Mane.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!