संतोष देशमुख या सरपंचाला मारतांना माणसे इतकी क्रूर होती,

मराठा समाज गलितगात्र झाला आहे.
संतोष देशमुख या सरपंचाला मारतांना माणसे इतकी क्रूर होती,हे आता विधानसभेत ही सांगितले.ज्यांनी सांगितले ते स्थानिक आणि जबाबदार आमदार आहेत.विरोधकाला मारतांना असा क्रूर प्रकार केला.ही वर्तमानातील घटना आहे.त्याविरोधात विधानसभेतील आमदार धस साहेब आणि आव्हाड साहेब यांनी मर्दाची भुमिका घेतली.येथे मराठा आमदारांचा मराठी बाणा हरवलेला दिसला.ग्लानी आली आहे.
जर समाजाविषयी कोणी टिका केली तर उठसूठ दंगा आणि तोडफोड करणारे मराठा आमदार, नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते आता तोंड उघडत नाहीत.फडणवीस सरकार चा पाठिंबा काढून घेत नाहीत.मराठा मुर्दाड झाल्याचा हा परिणाम आहे.मला वाटते चोरून दूध पिण्याचा हा परिणाम आहे.आमदाराला लढण्यासाठी जातीचा आधार घ्यावा लागते.माणूस हा आधार नाहीच.
या आधीही मी मराठ्यांच्या मानसिकतेचे विश्लेषण केले होते .त्यात फक्त जात समाज हा मुद्दा नाही.सोशल सायकॉलॉजी.जो समाज किंवा जाती समूह पुर्वजांच्या आड लपतो.तो स्वत्व विसरतो.तो निष्क्रिय झालेला असतो.त्याला राम, कृष्ण, बुद्ध, छत्रपती, गांधीजी यांचा वारंवार आधार घ्यावा लागतो.त्याशिवाय त्यांची ओळख नसतेच.स्वताची ओळख,स्वताचे आस्तित्व नसलेला किंवा हरवलेला माणूस नेहमीच जाती समूह,धर्म समूहाच्या तंबूत लपतो.ही ग्लानी आल्याचे, गलितगात्र झाल्याचे ,म्लेंच्छ झाल्याचे,मिंधे झाल्याचे लक्षण असते.
आम्ही कुणबी माणसे सुद्धा स्वताला मराठा लेबल लावून मिरवतो.मराठा समाजाच्या सभा, बैठकीला जातो.तेथे तर मी सांगतो,लिहीतो त्याचा प्रत्यक्ष दर्शी अनुभव येतो.नेहमीच चोर,लुटेरे,खुनी,गुन्हेगार यांचा सन्मान,सत्कार केला जातो.का? निव्वळ पैसा पुरवतो म्हणून.हे भयानक पाहून तरूणांवर काय परिणाम होत असेल,याचा आयोजक,प्रायोजक, संयोजक काहीच विचार करीत नाहीत.तसा,तितका विचार करण्याची मानसिकता उरलेली नाही.कोणत्याही वैध अवैध मार्गाने पैसा मिळवणे इतकाच प्राणी सदृश हेतू पाळला जातो.
महाराष्ट्रातील मराठा नेत्यांनीच बीड ,परभणी, नाशिक, जळगाव मधील चोरांना आणि गुंडांना आपल्या पक्षात बोलवून आमदार खासदार मंत्री बनवले.हेतू काय असेल?हेतू लपवता येतो.पण परिणाम लपवता येत नाही.तो आज दिसत आहे.तरीही मराठा समाज स्वताला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारस म्हणून मिरवत असेल तर मला तो वारसा खोटा वाटतो.नाटकी वाटतो.दिशाभूल वाटते.आपल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज बदनाम होतील का?याची तमा हे मराठे बाळगत नाहीत.
मी जळगाव जिल्ह्यातील माणूस.जळगांव जिल्ह्यातील अनेक मराठा आमदारांना मंत्री पदाची संधी मिळाली.काय केले? फक्त चोरी.कोणाची हकालपट्टी झाली.कोणी जेलमध्ये गेले.हे मी जवळून पाहिले आहे.तरीही त्यांचेच तुणतुणे वाजवणारा हा मराठा आणि कुणबी समाज.
दिल्लीहून राहुल गांधी परभणी येऊन पिडीतांना भेटले.पण महाराष्ट्रातील आमदारांना फुरसत मिळाली नाही.का निवडून दिले,या आमदारांना?फक्त निधीचे लचके तोडण्यासाठी!रेती मातीची ,राशनची चोरी करण्यासाठी!
कमजोर बाया माणसे देवी देवतांचे फोटो गळ्यात टांगून भीक मागतात.ही दयनीय अवस्था आहे.तसेच मराठा, कुणबी माणसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आड लपून चोरी, गुन्हेगारी करीत असतील तर हे दयनीय तर आहेच.पण छत्रपती शिवाजी महाराजांचे अवमूल्यन करणारे सुद्धा आहे.
इतिहास वाचला पाहिजे.पुर्वजांचा इतिहास प्रेरणा देतो.तर मग हिच का ती प्रेरणा?चोरी आणि गुन्हेगारीची?
युरोप अमेरिका खंडात अशी देवी दैवते पुजली जात नाहीत.चर्चमधे सुद्धा रविवारी किंवा ठराविक दिवशी, ठराविक वेळी जातात.पण आपले मानवी अस्तित्व,मानवी मुल्य विसरत नाहीत.म्हणून ते जगाच्या पुढे पळत आहेत.आणि आम्ही हिंदू मुसलमान फक्त पुर्वजांचे पोवाडे गात आहोत.आपला पोवाड्याचे काय? आपल्या कर्तुत्वाचे काय? आपल्या आस्तित्वाचे काय?आमचे आस्तित्व दगड मातीच्या सोने चांदीच्या मुर्ती स्वरूप पुर्वजांमधे हरवून गेले आहे.
राम, कृष्ण, बुद्ध, गांधी कोणाचेही पुजारी नव्हते.तेच त्यांच्या कर्तृत्वाने पुजेस पात्र ठरलेले आहेत.
...शिवराम पाटील
९२७०८६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत