कट कसे रचले जात आहेत, बघा..
पहिला कट,
गुंडागर्दीच्या आरोपाखाली राहूल गांधींना अटक करायची अन दुसरा कट पुन्हा एकदा राहूल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करायचे..
दोन खासदारांना धक्का दिल्याच्या आरोपाखाली राहूल गांधींच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
त्यात त्यांना अटक होऊ शकते..
निशिकांत दुबे या वाचाळ खासदाराने अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन विशेषाधिकार हननची तक्रार करत राहूल गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे..
काय गुन्हा केलाय राहूल गांधींनी?
राहूल गांधी यांनी दोन गुन्हे केलेत..
पहिला अदानी यांना अटक करण्याची मागणी लावून धरली..
दुसरा गुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याची अमित शहा यांनी माफी मागावी आणि त्यावर लोकसभेत चर्चा व्हावी अशी मागणी केली..
त्यासाठी संसदेत आणि रस्त्यावर त्यांनी आवाज उठविला..
हे दोन्ही घोर, संगीन अपराध आहेत..
नाही?
यावरून तर राहूल गांधी यांच्यावर कोणती कारवाई करता येऊ शकत नाही..
म्हणून दोन खासदारांना धक्का देऊन जखमी केल्याचं, संसद परिसरात गुंडागर्दी केल्याचं “कुभांड” रचलं गेलं..
कुभांड हा शब्दप्रयोग यासाठी की,
भाजपनं या धक्काबुक्कीचा कोणताही व्हिडिओ अजून दिलेला नाही..
का?
संसदेत पावलापावलावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत.. त्याचं फुटेज सरकारकडं नाही का?
नक्कीच आहे..
मग राहूल गांधी धक्काबुक्की करतानाचा व्हिडिओ का माध्यमांना दिला जात नाही..?
आरोप करणारांनी पुरावे दिले पाहिजेत..
हे तत्व भाजपला मान्य नसावं..
बघा,
अभिषेक मनु सिंघवी यांच्या खुर्चीखाली नोटांचे बड्डल मिळाल्याचा आरोप केला गेला.. कोणी ठेवले हे बंडल? राज्यसभेतील सीसीटीव्हीनं हे पाहिलंच असेल?
पण ते ही पुरावे न देता भाजपनं नुसता सणसणाटी आरोप केला..
पुढं काय झालं या प्रकरणाचं?
आता राहूल गांधी यांनी केलेल्या धक्काबुक्कीचं असंच..
सरकार पुरावे देत नाही..
केवळ सणसणाटी आरोप करत, गुन्हे दाखल करतंय..
अदानी प्रकरण आणि अमित शहा यांच्या वक्तव्यावरून देशाचं लक्ष अन्यत्र वेधण्यासाठी या करामती आहेत हे उघड आहे..
या सर्व गदारोळात संसदेत कामकाज झालंच नाही..
वेळ आणि देशाचा पैसा वाया गेला..
संसद चालविण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते.. इथं उलट घडलं..
सत्ताधारयांनीच काम होऊ दिलं नाही..
अदानीवर चर्चा झाली असती तर आकाश कोसळणार नव्हतं..
मात्र नरेंद्र मोदी अडचणीत आले असते..
म्हणून ही टाळाटाळ..
देशाचं राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर कधीच गेलं नव्हतं..
एस.एम.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत