लुजैन अल हाथलुल महिलांचे नेतृत्व् बंदिस्त होणार
गोड हास्य व तमाम महिलांचे नेतृत्व् बंदिस्त होणार
फोटो मधील मुलीचं नाव आहे लुजैन अल हाथलुल.. वय 31, ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातुन पदवीधर..
सौदी अरेबियातील सामाजिक कार्यकर्ती आहेत त्या.
स्त्रियांच्या अधिकारांसाठी लढतात, पण आता लढू शकणार नाहीत. कारण त्यांना तब्बल 6 वर्षांची शिक्षा झाली आहे.
भारतात एखादी चुकीची गोष्ट घडते तेव्हा आपण राज्यकर्त्यांना, नागरिकांना आणि शेवटी संविधानाला दोष देऊन मोकळे होतो, पण आपण स्वतः ती चुकीची गोष्ट दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतो का?? पुढाकार घेतो का?? तर नाही.
लुजैन यांचा गुन्हा इतकाच आहे त्या पुरुषी पालकत्व नाकरतात, म्हणजे एकटी स्त्री घराबाहेर पडू शकत नाही, ती बँकेत जाऊ शकत नाही, ती खरेदीला जाऊ शकत नाही, अगदी पासपोर्ट काढण्या पासून लग्न करण्यापासून ते घटस्फोट घेण्यापर्यंत सर्व अधिकार तिच्या घरातील पुरुषाला आहेत. त्यांनी परवानगी दिली तरच ह्या गोष्टी ती करू शकते. ह्याच ‘पुरुषी पालकत्व कायद्याला’ त्या विरोध करत आहेत, ते पण आजच्या काळात..
भारतीय सनातनी संस्कृतीत स्त्रीला जसं संविधाना आधी धार्मिक ग्रंथानुसार बाप, भाऊ, पती, मुलगा याच्या वरदहस्ताखालीच राहावे लागायचे तसाच अगदी सेम हा ‘पालकत्व कायदा’ आहे…
बरं, त्यांनी 2018 मध्ये दुसरा पण गुन्हा केलाय तो म्हणजे “स्त्री असून गाडी चालवण्याचा गुन्हा” म्हणजे तिकडे स्त्री गाडी सुदधा चालवू शकत नव्हती.. तिच्यावर राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा ठपका ठेऊन तिला तुरुंगात डांबलं गेलंय.
भारतासारख्या देशात आता चूल आणि मूल दूर सारून चार भिंतीच्या बाहेर निघून स्त्रीचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं आहे. अगदी गावची सरपंच ते देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपति पदावर जाण शक्य आहे.
26 जानेवारी 1950 ला भारतात संविधान लागू झालं आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. 1951 च्या पहिल्याच निवडणुकीला भारतीय स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला तो ही अगदी फुकट.
त्यासाठी त्यांना कुठलेही आंदोलन, मोर्चा किंवा कठोर परिश्रम करावे लागले नाहीत. तोच मतदानाचा अधिकार सौदी अरेबियातील स्त्रियांना 2015 मध्ये मिळतो. म्हणजे आपल्या नंतर तब्बल 65 वर्षांनी..बघा विचार करा..
स्त्रीचा उद्धार करणारा कायदा, हिन्दू कोड बिल या कायद्याचा विरोध व त्यासाठी परिश्रम घेणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध घोषणा देण्यात मात्र हाच महिलावर्ग पुढे होता हे दुर्दैव…
आजही भारतीय स्त्री उघडपणे संविधान काय आहे ? त्याने आपल्या आयुष्यात काय आमूलाग्र बदल घडवला आहे याबद्दल अनभिज्ञ आहेत. ते संविधान समजून घ्यायचा वाचून घ्यायचा प्रयत्न तर करत नाहीतच पण काही स्त्रिया संधी मिळेल तिथे त्याच संविधानाची अवहेलना करण्यात मात्र पुढे असतात..
आत्ताच ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती होती. पण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ठराविकच मूलीना त्याबाबत कल्पना होती. एका वृत्तवाहिनिवरील निवेदक तर, भिडे वाड्या समोर उभा राहून काही मूली/महिलांना प्रश्न विचारात होता की तुम्हाला मुलींसाठी काढलेली पहिली शाळा महितीय का ?
त्यावर उत्तर मिळायच नाही. काहींचा तर प्रतिप्रश्न पुण्यात आहे ??? बरं, सावित्री कोण ? माहीत नाही.
केवळ स्त्रियांचे स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, स्त्रियांचे मानवी हक्क मागितले म्हणून लुजैन नावाच्या ह्या तरुणीला तुरुंगात डांबले जात असेल तर, संविधानामुळे सर्व स्वातंत्र्य फुकट उपभोगणाऱ्या भारतीय स्त्रियांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही घटना म्हणता येईल..
व्रत वैकल्य, उपवास, झाडाला धागा गुंडाळून काही अपेक्षा ठेवण हे वयक्तित्क धार्मिक स्वातंत्र्य त्याच घटनेने कलम २५ नुसार सर्वांच दिले आहे.
हिन्दू कोड बिल,
संविधानातील राज्य धोरणातील निदेशक तत्व
कलम ४२
सती प्रथा विरोधक कायदा, १९८७
कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा २००५
समजून आत्मसात करायची गरज आहे.
लुजैन यांना एका मुलखातीत प्रश्न विचारला.
मुलभुत हक्कासाठी लढताना तुम्हाला शिक्षा झाली हे दुर्दैव आहे. पण याला मुख्य कारण कोणते आहे ??
लुजैन यांनी उत्तर दिलं, ‘आमच्या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर लाभले असते तर, मी आज राष्ट्राध्यक्ष असते व तुम्ही माझ्या मुलाखतीसाठी राष्ट्राध्यक्ष भवन येथे आला असता, इथे तूरुंगात नाही…’
बाकी उठता बसता “थँक यु बाबासाहेब थँक यु बाबासाहेब” म्हंटल तरी ते कमीच आहे.. इतके अनंत उपकार आहेत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर आणि विशेषतः स्त्रियांवर…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत