देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

नव्वदटक्के आमचा बौध्द अंधश्रध्दाळू आहे.हे मी जबाबदारीन मांडतोय.–वसंत कासारे.

🙏 अंधश्रध्दा 🙏

जगतविख्यात महाज्ञानी,सिम्बाॕल आॕफ द नाॕलेज म्हणजेच ज्ञानाच प्रतिक या पदविन ज्याला या विश्वान सन्मानित केल, त्या महामानवान आम्हाला तथागत गौतम बुध्दांचा धम्म दिला. धम्मज्ञान चोरून स्वतःच्या नावावर नाही खपवल. का दिला आम्हाला तथागत बुध्दांचा धम्म ? स्वतः ज्ञानाचा महासागर असताना .
याचं एकमेव कारण म्हणजे महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला अज्ञानाच्या, शोषणाच्या, अंधश्रध्देच्या , लाचार जिल्लतीच्या नरकातून बाहेर काढायच होत. हजारो वर्ष नरकातील नरकवासाला सरावलेल्यांना या नरकातून सहज बाहेर पडता याव म्हणून या आपल्या महान बापान बावीस प्रतिज्ञांची महा शक्ती दिली. या बावीस प्रतिज्ञा आणि बुध्द धम्माच आपण प्रामाणिकपणे आचरण केल असत तर आज आपला समाज सत्ताधारी समाज म्हणून सहज मिरवला असता या देशात. परंतु आमचा समाज अज्ञान आणि अंधश्रध्देच्या नरकातून बाहेर पडायलाच तयार नाही. जोवर आमचा समाज अंधश्रध्देतून बाहेर पडत नाही आणि नितिवान समाज ही ओळख निर्माण करीत नाही तोवर आमचा समाज नरकात लोळत राहाणार. गटातटात, हेव्यादाव्यात जळत राहाणार.
काल जलदान विधीला गेलो होतो. आमचा तरुण बांधव वयाच्या तेहत्तीसाव्या वर्षी रोड अॕक्सीडंटमध्ये गेला. मागे विधवा आई,पत्नी आणि दोन लहान लेकर. एक तर दोन महिन्याची मुलगी आहे .जाणारा गेला पण मागे राहीलेत त्यांच्या दुःखाच सांत्वन करण्याच सामर्थ्य कुणाच्याच शब्दात नाही. त्यांच्या दुःखाच औषध एकच. काळ. जसजसा काळ पुढ जाईल . त्यांच दुःख कमी कमी होईल. दोन लेकर अजाण आहेत. पण आई आणि पत्नी दोघींच दुःख काळच कमी करील. इथ सांगण्याचा मुद्दा हा आहे की, का होतात या तरूण तरूण मुलांचे अपघात ?
मला सापडलेली प्रमुख दोन कारण.
1)बेदरकारपणे गाडी चालवण.
2) दारू सारख व्यसन असण.
माझ्या या तरूण बांधवाचा आपघात या पैकी एका कारणान झाला हे नक्की.
परंतु आणखीन एक चर्चा ऐकण्यात आली.
काही दिवसापूर्वी त्याच्या बाईकवर घुबड येऊन बसल. तो घाबरला आणि त्याला ताप आला. असे अधून मधून काही प्रकार घडत होते. एक दिवस अचानक त्याच्या रस्त्यात आडव प्रेत ठेवलेल त्याला आढळल. तो नेहमी काम आटोपून रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान घरी यायचा.
चर्चेत अस मी स्वतः ऐकल की एक वर्ष त्याच्या माग ती सैतानी शक्ती होती. शेवटी प्रेताच्या रुपान आडव येऊन त्यान त्याला संपवल. प्रेत पाहून तो घाबरला. गाडीवरील ताबा सुटला आणि त्याचा अपघात झाला.
हा प्रकार सांगणा-या माणसाला मला काय सांगायच ते मी सांगितल. पण त्या माणसान मलाच मूर्खात काढल.
हा किस्सा सांगण्याच कारण एकच.
बा भीमान आम्हाला बुध्दांचा धम्म का दिला ? जर आमची लोक अजून नरकातल खाऊन जगत असतील तर याला जबाबदार कोण ? काय करतात आमच्या धार्मीक संघटना ? लोकांच्या मनातल्या या अंधश्रध्दा काढायला का अपयश आलय यांना.
चिंतन मनन करण्यासारखी गोष्ट आहे. एका ज्ञानियांच्या गावात पाचसहा वर्षा पुर्वी तरूण जवान मुलगी मांत्रीकान मारली. तीही आई आणि मावशीच्या अंधश्रध्देच्या हव्व्यासा पायी.
कधी करायचा याचा विचार. का होत नाही उपाययोजना ?
जादू टोणा,बुवा बापू, करणी, देवदेव यातून कधी बाहेर पडेल समाज आपला ? महामानव डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा शहाणे आहोत का आपण ? त्यांचही ऐकत नाही. त्यांनी दिलेल्या मार्गावरून चालायला तयार नाही. धार्मीक संघटना काय फक्त लग्न, जलदानविधी, गृह प्रवेश , श्रामणेर शिबीर भरवण्या पुरते आणि पद प्रतिष्ठा भुषवण्यापुरते आहेत का ? श्रमणेर झालेले लोक श्रामणेरासारखे वागत नाहीत. त्यांच्यावर का अंकुश नाही या धार्मीक संघटनांचा ? तेच श्रामणेर, बौध्दाचारी हिंदू सण साजरे करतात. गणपतीची आरती करतात, घरात घट बसवतात, गोविंदा खेळतात, गरबा खेळतात, व्यभिचार करतात, दिवाळी हिंदू नाही करीत इतकी थाटात साजरी करतात.
काय आदर्श घ्यायचा सामान्य मणसान !
कसा नितिवान समाज निर्माण होईल ?
मी श्रामणेर व्हायला गेलो होतो. मला श्रामणेर होऊ दिल नाही. मुंडण केलेल्या अवस्थेत मला घरी पाठवल. परंतु ज्यांनी मला घरी पाठवल त्या श्रामणेरांपेक्षा मी कितीतरी पटीन धम्माच उत्तम प्रकारे आचरण करतोय. माझ्या बरोबर आणि माझ्या नंतर श्रामणेर झालेले कित्येक श्रामणेर वाममार्गाला लागलेत. पुराव्या सह दाखऊन देईन.
काल जालदान विधीला एका बांधवान भाषणात विषय मांडला, की पंचशिलाच आचरण केल तर असे तरूण वयात येणा-या मृत्युचे प्रमाण कमी होईल. हे वास्तव त्यान मांडल्या बरोबर चलबिचल झाली. विषयांतर नको. अस लोक बोलू लागले. त्यांना भाषण आवरत घ्यायला सांगितल. मलाही असच सांगतात. बर बोलणारे चालतात खर बोलणारे नाही चालत. माणूस मेल्यावर सर्वच लोक तो किती चांगला होता. किती प्रेमळ होता. त्यान समाजासाठी खूप काही केल. अस भाषणात सांगतात. पण तो असा अचानक का मेला ? मृत्युच कारण काय ? त्याचा मृत्यु ज्या कारणान झाला ते कारण टाळता आल नसत का. त्यान वेगावर नियंत्रण ठेऊन गाडी चालवली असती. दारू पिऊन गाडी चालवली नसती, मोबाईल कानाला लाऊन गाडी चालवली नसती, बुवा बापूंच्या नादाला लागले नसते तर हे मृत्यु टाळता आले नसते का ? याचा विचार कधी करणार आहोत आपण ? चूक काय बरोबर काय हे का कळत नाही अजून आपल्या लोकांना ? कारण आपण बुध्द जाणला नाही. जाणला नाही म्हणून आचरणात आणलाच नाही. आपण झालो नाही बुध्द मग कसे होऊ शुध्द ? म्हणून प्रत्येकान बुध्द होण गरजेच आहे. अतः दिपः होण गरजेच आहे. अतः दिपः भवः होण म्हणजेच
बुध्द धम्माच्या ज्ञानान ज्ञानी होण. झालो का आम्ही बुध्द ? हो म्हणण्याच सामर्थ्य आहे का कुणाच्यात ? म्हणून तर आम्हाला भूत लागतो. म्हणूनतर आम्ही कुळदेवाला नारळ देतो. म्हणून तर आम्ही करणी जादू टोण्याच्या आहारी जातो. म्हणूनतर आम्ही जत्रा वा-या करतो. म्हणून तर आम्ही हिंदूंचे सण साजरे करतो. म्हणूनतर आम्ही पंचशिलाचे आचरण करीत नाही. म्हणूनतर आम्ही मनुवादी पक्ष ,नेते,संघटनांचे तळवे चाटतो.म्हणूनतर आमचे काही बौध्दाचारी काही श्रामणेर अधम्मीय वर्तन करून धम्म कलंकीत करतात. पंचशिलाच अक्षरशः उल्लंघन करतात. (माझ्याकडे पुरावे आहेत.) आमचा समाज बुध्द होऊन शुध्द न झाल्यामुळच गटातटात विखुरला. हेव्या दाव्यान एक मेकांचा पराकोटीचा द्वेष करीत धम्मरथ माग ढकलू लागला. मला श्रामणेर शिबीराला बसू न देणारे आजही माझा पराकोटीचा द्वेष करतात आणि पांढरे कपडे घालून समाजाला समता, बंधूता आणि मैत्रीचे धडे देतात 😄 वास्तविक पाहता मी धम्मापासून दूर जायला हव होत. मी सूड भावनेन वागायला पाहिजे होत. पण ही संघटना मला दुःख देऊन , स्वतः अधम्मीय कृत्य करून आज दहा वर्ष माझा द्वेष करते. यांना आजही वाटत नाही की आमच्याकडून अधम्मीय अकुशल कर्म घडलय. मग कसले हे धम्माचे उत्तरदायी ? मुळात हे बुध्दच झालेले नाही. कपडे पांढरे आणि अंतःकरण काळ असेल तुमच तर तुम्ही धम्मरथ पुढ नेताय की माग ढकलताय ?
वास्तव कधी स्विकारील समाज आपला ?
वाईट वाटत खूप.
अंतःकरण जळत खूप.
काय कराव ?
कस समजवाव ?
दिशाहीन झाला समाज.
भरकटला समाज.
बाबा तुमचा धम्मरथ पुन्हा नरकाच्या दलदलीत घालील हा समाज.
माफ करा बाबा.
आम्ही धम्मरथ आहे तिथही नाही ठाम उभा ठेवला.
बाबा महारांनी धम्म बाटवला, नासवला, हा आम्ही कलंक लावला.
कलंक लावला.😔
माझ्या लेखणीच्या माध्यमातून मी शब्दांचे आसूड ओढून समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. पण जागृत होण्या ऐवजी लोक मलाच दोषी ठरवतात. मला बर बोलण जमत नाही. खर बोलण तुम्हाला सहन होत नसेल तर तो दोष माझा नाही. मी शिव्या देत नाही. की तुमच काही वाईट व्हाव या हेतून चुकीचा मार्ग दाखवित नाही. ज्यांना ज्यांना माझ बोलण झोंबत त्यांच्यातच कुठतरी मनुवादान नासलेली जखम आहे. म्हणून त्यांना सत्य झोंबत.
बांधवांनो झोंबणा-या औषधानच जखमा लवकर ब-या होतात. हे झोंबणार औषध सहन करण्याची तयारी ठेवा. आणि सत्य बोलणारांना सपोर्ट करा. मनुवादान नासलेल्या लोकांना विरोध करा. तरच बा भीमाच स्वप्न आपण पूर्ण करू.
अन्यथा गळ्यात मडक आणि कंबरेला झाडू बांधणारे तयारच आहेत या दोन्ही वस्तू घेऊन.
काळ भयानक आहे. जागृत व्हा. एक व्हा. नेक व्हा. ही आजची तातडीची गरज आहे.
🙏
वसंत कासारे.
(8087480221)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!