महात्मा फुलेंची गोष्ट
एके दिवशी महात्मा फुले हे आपल्या दिवसभराचे काम आटोपून घरी आले होते. आणि रात्रीचे भोजन करून ते झोपी गेले होते. मध्य रात्री
त्यांना काहीतरी वाजल्याचा आवाज आला आणि त्यांना जाग आली. त्यांच्या घरात मेणबत्तीच्य उजेडामध्ये दोन आकृत्या पुसट अशा दिसल्या. म्हणून महात्मा फुलेंनी मोठ्या आवाजात विचारलं कोण आहे रे तिकडे ?
त्यातील एका व्यक्तीने उत्तर दिले आम्ही तुमचा निकाल लावायला आलो आहोत.
आणि लगेच दुसरा व्यक्ती म्हणाला आम्ही तुम्हाला ठार मारायला आलो आहोत.
त्यावर महात्मा फुले यांनी न घाबरता विचारले तरी पण मी तुमच्या काय अपराध केलेला आहे तुम्ही मला ठार मारणार आहात ते.
त्यावर त्यातील एक व्यक्ती म्हणाला तुम्ही आमचा काही अपराध केलेला नाही.
त्यावर महात्मा फुले म्हणाले मग तुम्ही मला का मारत आहात.
त्यावर त्यातील एक व्यक्ती म्हणाली तुम्हाला मारण्यासाठी आम्हाला पाठवले आहे.
तेव्हा महात्मा फुले त्यांना म्हणाले मला मारल्यामुळे तुमचा काय फायदा होणार आहे.
आम्ही जर तुम्हाला मारले तर आम्हाला प्रत्येकी एक एक हजार रुपये मिळणार आहेत असं त्या एका व्यक्तीने सांगितले.
अरे वा माझ्या मरणाने तुमचा फायदा होणार असेल तर मला खुशाल मारा. त्यामुळे माझे मरण सत्कारणी लागेल. मी माझे मरण त्यामुळे तुम्हाला फायदा होत असेल तर माझे मरण सार्थकी लागेल.
खुशाल मारा मला. हा मी तुमच्यासमोर उभा आहे.
महात्मा फुलेंचे हे शब्द एकूण त्या दोन्ही माणसांच्या मनात सदभावना जागृत झाली. आणि त्यांनी आपल्या हातातील शस्त्र खाली ठेवली. महात्मा फुलेंना शरण गेले. आणि म्हणाले आमच्यातून खूप मोठी चूक होणार होती. आम्हाला क्षमा करा .
त्यावर महात्मा फुले यांनी त्या दोघांनाही क्षमा केली.
त्यानंतर त्यातील एक व्यक्ती म्हणाला आम्हाला तुमची परवानगी पाहिजे ज्याने तुम्हाला मारण्यासाठी आम्हाला सांगितले त्याला आम्ही ठार मारू त्यासाठी आपली परवानगी द्यावी.
त्यावर महात्मा फुले त्यांना म्हणाले. अरे मी जसे तुम्हाला माफ केले . तसेच त्यालाही माफ केले आहे. तुम्ही त्याला माफ करावे. हीच खरी माणुसकी आहे. त्यामुळे त्याला मारण्याचा विषय सोडून द्या. ते दोघेही मारेकरी महात्मा फुलेंचे सहकारी झाले. त्यापैकी एक होता रोडी. आणि दुसरा होता धोंडीराम नामदेव.
संजय सखाराम पवार
खांडोत्री
तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी
मो. न.9137440340
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत