दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
कवी सायमन मार्टीन लिहितात-
तथागत बुद्ध रस्त्याने जाताना
अनेकजण शिव्याशाप देत रस्त्याच्या कडेला उभे असायचे
दोष त्यांचाही नव्हता
नवीन मन्वंतर होतं
नवं आकाश होतं
नवीन पृथ्वी होती
त्या बिचाऱ्यांना काय ठाऊक
त्यांना वाटायचं हा सारं काही नष्ट करायला आला आहे
पण तसं नव्हतं
तो तर साक्षात परमतत्त्व होता
ज्याला आदी नाही ज्याला अंत नाही असा विचार होता
तथागत संतापले नाहीत
त्यांनी शिव्याशाप दिले नाहीत
तेथेच करुणेचा जन्म झाला
आपला आदर्श तोच बुद्ध आहे
सारीच माझी लेकरं हा संदेश देत
विश्व व्यापणारा
कोणी निंदा कोणी वंदा
बुद्ध देणे हाच आमचा वारसा
~ सायमन मार्टीन
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत