दिन विशेषदेशनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

संविधान दिनी संविधानाचाच खून!

महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
रविवार दि. 24 नोव्हेंबर 2024.
मो.नं. 8888182324

            26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून देशात साजरा केला जातो. मात्र, देशातील आर्थिक केंद्र असलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नुकतीच पार पडून त्यात भाजप प्रणित महायुतीने 288 पैकी 235 जागा जिंकून महाविजय मिळविला आहे. *परंतु, या विजयापेक्षा उध्दव ठाकरे, शरद पवार आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेल्या काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांचा "शानदार पराभवाचीच" चर्चा जास्त होतांना दिसत आहे.* विरोधीपक्षच नसलेले हे नवीन सरकार *"संविधान दिनी"* म्हणजेच 26 नोव्हेंबर 2024 रोजी राज्याचा कारभार सुरु करणार आहेत. ज्या विजयावरच प्रश्नचिन्ह उभे असून ज्यांनी मतदान केले ते मतदार, विरोधीपक्ष, राजकीय तज्ञ मंडळी, अभ्यासक, विश्लेशक, न्युज चँनेल, दिग्गज पत्रकार असे सर्वच या विजयाने आश्चर्यचकित झाले आहेत. तज्ञांचे सर्व अंदाज *"फेल"* ठरवणारा हा निकाल विजय संपादन करणारा उमेदवारही स्वतःच्या विजयाने संभ्रमित आहे. त्यामुळे इतका मोठा विजय मिळवूनही हवा तसा आनंदोत्सव साजरा होताना दिसत नाही. *म्हणजेच संशयास्पद विजय मिळवून सत्ता स्थापन करणा-या महायुतीचा "संविधान दिनी" राज्याचा कारभार हाती घेणे म्हणजे संविधानाचा घोर अवमान आणि एकप्रकारे खून करण्यासारखेच आहे.*

           या निवडणुकीत मतदारांनी आपल्या *"बहुमूल्य"* मताची किंमत शून्य केली आहे. आपले मत विकून त्याची किंमत वसूल करुन आपला आत्माच विकला आहे. मतदारांनी सदसद्विवेकबुद्धी जागृत न ठेवता मतदान केले आहे. *निवडणूकीची "आदर्श आचारसंहिता" लागू झाल्यापासून भाजप आणि मित्रपक्षांनी रोकड, मटण, दारूच्या ओल्या पार्टींनी कार्यकर्त्यांना न्हावून टाकले होते. मतदानाच्या दिवशी तर इतिहासात कधी नव्हे इतका पैशाचा अक्षरशः धो धो पाऊस पडला. या पावसात महागाई, बेरोजगारी आणि सरकारच्या विरोधातील सर्व "रोष" वाहून गेला. लाडक्या बहिणीच्या नावाखाली संशयास्पद असलेल्या evm मशिन्स आणि मतमोजणीमध्ये गडबड करुन मोठ्या प्रमाणात मतांची हेराफेरी केली. विजयी उमेदवार आणि विरोधक यांच्या मतांच्या तफावत वरुनच लक्षात येईल की, काहीतरी गडबड नक्कीच आहे.* 

           महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दहिसर विधानसभेचे उमेदवार राजेश येरुणकर यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील त्यांच्या बूथवरील evm मशिनवर त्यांची आई, पत्नी आणि मुलांचेही मतदान त्यांना झाले नाही म्हणजे दोन मतेही त्यांना न मिळणे हे कसे शक्य आहे? शिवाय evm मशिन नंबर व 17-क फॉर्म मधील मतदानाची आकडेवारी मॅच होत नाही? त्याचबरोबर डोंबिवली येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मतमोजणी प्रतिनिधींनी  evm मशिन नंबर आणि 17-क फॉर्म मधील मतदानाच्या आकडेवारीत तफावत असल्यामुळे लेखी हरकत घेऊनही त्यांचे कोणीच ऐकून घ्यायला तयार नव्हते म्हणून त्यांनी मतमोजणीवर बहिष्कार टाकून बाहेर येऊन पत्रकारांसमोर ही बाब सांगितली. *म्हणजेच अशाप्रकारे मतदानात गडबड घोटाळा करुन बेकायदेशीररित्या सरकार स्धापन करणे घटनाबाह्य आणि संविधान विरोधी आहे.* 

           *आधीच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल न देऊन खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनीच संविधानाचा अवमान केला आहे.* सर्वोच्च न्यायालय जर सत्ताधारांच्या हातचे बाहुले बनत असेल तर जनतेने न्यायाची अपेक्षा कोणाकडून करायची? *सर्वोच्च न्यायालयाच्या मदतीने "घटना विरोधी" महाराष्ट्र सरकारचा अडीच वर्षापूर्वी सुरु झालेला प्रवास मतदानात हेराफेरी करुन लोकशाहीला काळे फासून संविधान दिनी 26 नोव्हेंबर 2024 रोजी पुन्हा सत्ता स्थापन करणे म्हणजे जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात हुकुमशाही सुरु झाल्याचे संकेत देत आहे.* ✍️

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!