दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

महाविकास आघाडीला प्रश्न विचारले असते तर?

Pradnya Daya Pawar आणि तत्सम मविआ साठी राबणार्यांनी वंचितला लक्ष्य करण्याऐवजी महाविकास आघाडीला प्रश्न विचारले असते तर त्यांनी लोकसभेला ३१ जागा आपल्याला का मिळाल्या याचे आत्मचिंतन केले असते. बौद्धांना आणि मुसलमानांना किमान प्रत्येकी ३० जागा सोडल्या असत्या तर वंचितवर आगपाखड करण्यासाठी असे भाड्याने घेतलेले लोक कामाला लावायची गरज पडली नसती.

आरक्षणात वर्गीकरण का केले हा सवाल राहुल गांधींना केला असता तर निवडणुकीच्या दरम्यान राहुल गांधींना निर्णय फिरवावा लागला असता. त्याचा चांगला संदेश बौद्धांमधे गेला असता. पण राहुल गांधी या लोकांच्या पदराआड दडत राहिला आणि हे त्याला दडवून वंचितवर शरसंधान करत राहीले. बाबासाहेबांना बेईमान होऊन डावे आणि कॉंग्रेस या पक्षांच्या नादाला लागलेल्या या लोकांकडून तशाही फारशा अपेक्षा नव्हत्या. पण त्यांना खरंच मविआची काळजी असती, डोक्यात किंचितशी अक्कल असती तर जातीतल्या वर्गीकरणाबद्दल निवडणुकीत राहुल गांधीला स्टेटमेण्ट द्यायला यांनी नक्की सांगितलं असतं.

अर्थात ग्राहकाची असुरक्षितता हाच आमचा धंदा हे ज्यांचे ब्रीदवाक्य आहे ते कशाला अशिलाला असे सल्ले देतील ?
काहींची थोबाडं योग्य वेळ येताच फुटत असतात. वेळ हे सर्व रोगावरचं जालीम औषध आहे.

बौद्धांनी यांना हाकलून देऊन आपलं उत्तर दिलं आहे. आता यांचे दुकान फार काळ चालेल असे वाटत नाही. उद्या हे भाजपचा प्रचार करताना दिसले तर नवल वाटू नये.

बदलत्या परिस्थितीत मुस्लिमांनी नातेवाईकांना तिकीटे देणार्या मविआला मत देऊन मत वाया न घालवता बौद्ध, इतर दलितांसोबत एकत्र येऊन खरी खुरू जनतेची महाआघाडी बनवून स्वत: सत्तेत सहभागी होण्यावर भर दिला पाहीजे. भाजप पुन्हा सत्तेत आली असली तरी केंद्रातले भाजपचे सरकार आता शक्तीशाली नाही. अनेक ठिकाणी चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्या दबावाखाली काही निर्णय फिरवले जात आहेत.

राज्यातले सरकार आता पूर्वीइतके बेबंद असणार नाही.
जाता जाता पुरोगामी बुरख्यातली कीड कीटकनाशके फवारून मारून टाकल्याबद्दल मतदारांचे आभार.आता खरी खुरी पुरोगामी आघाडी अस्तित्वात येईल. सरंजामशाही इतक्यातच संपेल असे नाही, पण ती शक्तीहीन होत चालली आहे.

बौद्ध, मुसलमान, ओबीसी यांनी किती दिवस आपले मत इतरांना सत्तेत बसवायला द्यायचे याचा विचार करावा. भाजप आणि कॉंग्रेस राष्ट्रवादी यांच्याकडे त्यांची स्वत:ची मतं आहेत का ?

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!