निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

महाराष्ट्राचे राजकारण, अर्थकारण, समाजकारण, लोकशाही मूल्य रसातळाला नेऊन ठेवणारे

ओळखा पाहू हे कोण?

तुम्हाला समजत नसेल तर हिंट /क्ल्यू clue देतो, मग तर ओळखाल.

‘जलयुक्त शिवार अभियान’ द्वारे ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे’ स्वप्न दाखवून ‘टॅंकरग्रस्त कोरडवाहू राज्य’ केले. त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. चौकशी निःपक्षपाती पणे केली नाही.

राजकीय फायद्यासाठी 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यावर पांघरून घातले. प्रकल्प प्रलंबित ठेवले.

सर्वोच्च न्यायालय व विधानसभा अध्यक्षाच्या मदतीने अपात्र आमदारांचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा मोडीत काढला. लोकशाही मूल्य पायदळी तुडवले. व ‘राजनैतिक व्यभीचार’ केला.

कर्जमाफी योजनांमध्ये क्लिष्ट निकष, अटीतटी ठेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवले. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे फक्त गाजर दाखवले.

शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष फोडून ‘पक्षफोड्या’ असा किताब मिळवला.

मराठा, धनगर, ओबीसी, दलित मध्ये फाटाफुट करून त्यांच्यात भांडणे लावली.

शेतकऱ्यांना दिवसा वीज अशा घोषणा करून सौर ऊर्जा योजना माथी मारली. वीज प्रकल्प मूलभूत पायाभूत सुविधांची गुंतवणूक केली नाही.

गृहमंत्री म्हणून वचक ठेवला नाही. सुसंस्कृत, शांत व संत परंपरच्या महाराष्ट्राचे गुन्हेगाराचे, बलात्कारीचे, ड्रगग्रस्त व कोयता राज्य केले. अल्पवयीन मुलीही असुरक्षित.

*न्यायालयात न टिकणारे *खोटे आरक्षण देऊन मराठ्यांची दिशाभूल केली*.

3600 कोटी रुपयाचा अरबी समुद्रातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याच्या, ‘शिव स्मारक’ प्रकल्पाचे स्वप्न दाखवले. आठ वर्षे झाली, तिथे एक विट ही अजून उभारली गेली नाही.

त्यांचा पॅटर्न : केल्यासारखे दाखवतात, पण काहीच करत नाहीत.

जलजीवन मिशन सारख्या पूर्ण न झालेल्या अनेक प्रकल्पाची खोटी जाहिरात करून जनतेच्या पैशाची करोडो रुपयांची उधळपट्टी केली.

स्वतः न बोलता, सत्ता व पद मिळण्यासाठी लाचार झालेल्या सहकारी बहुजन चमच्यांकडून वादग्रस्त व वाह्यात वक्तव्ये करून घेण्याची नीच रणनीती.

महाराष्ट्रातील भूखंड, वीज निर्मिती, वितरण, मीटर, कोळसा खरेदी वगैरे प्रकल्प अदानीच्या घशात घातले.

फॉक्सकॉन-वेदांता, टाटा एअरबस (नागपूरला भूमिपूजन झालेला) असे अनेक महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले. त्यामुळे 18 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक बाहेर गेली. त्यामुळे 1 लाख तरुण युवकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी गमावल्या.

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घाई गडबडीत निकृष्ट दर्जाचा केल्यामुळे पडला. ज्यामुळे शिव प्रेमींची मने दुखावली.

महाराष्ट्रात फुकट वाटप रेवडी पद्धत आणून आत्मसन्मान संस्कृतीकडून भिकारी पद्धतीकडे वाटचाल सुरु केली.

महाराष्ट्राचे 2014 मध्ये 2.94 लाख कोटी रु. कर्ज होते. ते आज अडीच पट, 7.82 लाख कोटी रु. झाले असून देशात क्रमांक 2 चे कर्जबाजारी राज्य केले.

सरकारच्या आकडेवारी नुसार गेल्या दशकात भारतातील महाराष्ट्राचे योगदान, जीडीपी (राष्ट्रीय सकल उत्पन्न) प्रथमच 2.1 टक्क्यांनी घसरले आहे. दरडोई उत्पन्न, जे राज्यातील आर्थिक सुबत्तेचे निकष असते, त्यात मोठ्या प्रमाणावर घसरण केली.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा संशयास्पद एन्काऊंटर करून मूळ सूत्रधारांचा बचाव केला. व ‘बदला पूरा’ अशी पोस्टरबाजी केली.

दाभोळकर खून खटल्यामध्ये तपास करण्यामध्ये 11 वर्षाचा विलंब केला. शेवटी दोषींना शिक्षा झाली, पण पुराव्या अभावी मुख्य सूत्रधार निर्दोष सुटले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या मध्ये देशात महाराष्ट्र राज्याचा प्रथम क्रमांक मेंटेन (कायम) केला. काहीही ठोस उपाययोजना केल्या नाहीत.

विरोधी पक्षात असताना सोयाबीनचे भाव 8000/- रु/ क्विंटल मिळावे म्हणून आंदोलने केली. आज 10 वर्षां पूर्वीचाच भाव, 4000 रु./ क्विंटल आणून ठेवला.

विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारीने, उच्च न्यायालयाने आदेश देऊनही, 4 वर्षे निष्क्रय राहून नियुक्ती केली नाही. ह्या उलट स्व पक्षाच्या शिफारसी प्रमाणे मागच्या महिन्यात 7 आमदारांना राज्यपालाने एका रात्रीत मान्यता दिली व त्यांचा शपथविधी ही पार पडला. ‘राज्यपाल हा राजकीय नसतो’ हा पायंडा पायदळी तुडवला.

विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय वगैरे चा जाच लावून त्यांना पक्षांतर करण्यास भाग पाडून नवीन “राजनैतिक व्यभिचाराचा” पायंडा पाडला.

महाराष्ट्राच्या नैतिक राजकारणाचा अक्षरशः चिखल केला.

सत्य मांडणाऱ्या विरोधी सामाजिक कार्यकर्त्यांना ‘शहरी नक्षलवादी‘ म्हणून हिणवले व काहींना तुरुंगात टाकले.

भुमि अधिग्रहण कायद्यामध्ये 26 एप्रिल 2018 साली मोडतोड करून अन्यायकारक पद्धतीने, शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन गिळणगृत करून त्यांना भूमिहीन बनवले.

आता तरी ओळखले का?

सोबत: फोटो

सतीश देशमुख, B.E. (Mech.), पुणे
अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स 9881495518

एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!